For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्त्यांच्या बाजूची बेकायदा बांधकामे हटवावीच लागेल

12:44 PM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
रस्त्यांच्या बाजूची बेकायदा बांधकामे हटवावीच लागेल
Advertisement

पंचायतमंत्री माविन गुदीन्हो यांची माहिती

Advertisement

म्हापसा : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यांच्या बाजूची बेकायदेशीर बांधकामे हटवावी लागणार आहेत. कारण त्यामुळे वाहतुकीतील अडथळ्यांसह अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे अशी बांधकामे मोडावीच लागणार आहेत, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे. ही बेकायदा बांधकामे हटविण्याची मोठी जबाबदारी ग्रामपंचायत सचिव, सरपंचावर आहे. जी घरे पूर्वीपासून उभी आहेत आणि स्वत:च्या जागेत आहेत, आणि जी वाहतुकीला अडथळा ठरत नाहीत, ती घरे वाचविण्यासाठी सरकार अवश्य प्रयत्न करणार आहे. भाजप सरकार गोमंतकीयांचे हीत सांभाळणार आहे. आमच्या सरकारला लोकांना त्रास द्यायचे नाहीत, पण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे, की रस्त्यांवर जी बांधकामे आहेत, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो, ती काढून टाका. न्यायालयाच्या आदेशाचे पालन सर्वांना करावेच लागेल, असेही गुदिन्हो म्हणाले.

कांदोळी येथे काल गुरुवारी पंचायत घर, नवीन सभागृह, सेल्फ हेल्प ग्रुपसाठी नवीन दुकानांच्या कामाचा शुभारंभ व नवीन पंचायत घराचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री गुदिन्हो बोलत होते. व्यासपीठावर आमदार मायकल लोबो, सरपंच ब्लेझ मिनेझीस, गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास, उपसरपंच अॅमेलिया फर्नांडिस, हडफडे सरपंच रोशन रेडकर, पर्रा सरपंच डॅनिअल लोबो, माजी सभापती तोमाझीन कार्दोझ, जि. पं. सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर उपस्थित होते.

Advertisement

कांदोळी पंचायतीत स्वच्छता पहायला मिळाली. चिखली, होंडा या तीनच पंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम पहायला मिळाली आहे. भाजप सरकारने नवीन 35 पंचायत इमारती बांधल्या आहेत. अनेक नूतनीकरणाच्या वाटेवर आहेत. हे काम डबल इंजिन सरकारामध्येच होऊ शकते. तीन पूल, जुवारी पूल आदी उदाहरणे आहेत. आमचा गोवा विकसित प्रदेश आहे. सर्वत्र चांगले काम पहायला मिळत आहे. गोवा स्वच्छ व हरित ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात फोर्ट आग्वाद ताज ते कळंगुट दरम्यान ये-जा करण्यासाठी पूल बांधणे आवश्यक आहे. बायपास रस्ता गरजेचा आहे. सेंट आलेक्स चर्च ते पुढे बागा दरम्यान रस्ता होणे गरजेचे आहे, अस आमदार मायकल लोबो म्हणाले. स्वागत सरपंच ब्लेझ फर्नांडिस यांनी केले. माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य फेरमिनो फर्नांडिस यांचा पंचायत मंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.  तसेच माजी पंच सदस्य तसेच मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Advertisement
Tags :

.