कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : विनापरवाना बैल वाहतूक करणारी व्हॅन पकडली, एकजण ताब्यात

11:31 AM May 06, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

20 हजार रूपये किंमतीच्या बैलांसह 4 लाखांची व्हॅनही जप्त, खेड पोलिसांची कारवाई

Advertisement

खेड : तालुक्यातील काडवली-केळणे मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन बैलांची बेकायदेशीररित्या वाहतूक करणारी बोलेरो पिकअप व्हॅन ग्रामस्थांच्या मदतीने पकडली. नितीन गंगाराम चव्हाण (35 रा. आंबडस-खेड) याला ताब्यात घेण्यात आले. 20 हजार रूपये किंमतीच्या दोन बैलांसह 4 लाखांची बोलेरो पिकअप व्हॅन पोलिसांनी हस्तगत केली.

Advertisement

नितीन चव्हाण हा बोलेरो (एम.एच. 11 बी.एल. 3431) पिकअप व्हॅनमधून दोन बैलांची बेकायदेशीरपणे वाहतूक करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच सापळा रचला. या बाबत वावे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांना खबर दिल्यानंतर सहकाऱ्यांसमवेत काडवली-केळणे मार्गावर पोहचले. या मार्गावर बोलेरो पिकअप व्हॅनची पोलिसांनी झडती घेतली असता 2 बैल आढळले.

संशयिताकडे विचारणा केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी दोन बैलांसह बोलेरो व्हॅन जप्त करत येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आणली. आवारातील एका झाडाखाली बांधून ठेवण्यात आलेल्या दोन्ही बैलांची तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. बैलांना पाणी व चाराही देण्यात आला.

बेकायदेशीरपणे बैलांची वाहतूक केल्याचा ठपका ठेवत पोलीस कॉन्स्टेबल विशाल भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयितावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे करत आहेत.

Advertisement
Tags :
@ratnagiri#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaillegal bull transferkokan news
Next Article