For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील बेकायदेशीर फलक हटविले

11:31 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
शहरातील बेकायदेशीर फलक हटविले
Advertisement

अतिक्रमण हटाव मोहीम पथकाची कारवाई

Advertisement

बेळगाव : शहरामध्ये विविध ठिकाणी बेकायदेशीररित्या जाहिरात फलकांची उभारणी करण्यात आली होती. विविध सणांनिमित्त जाहिरातीचे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. त्या फलकांवर मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने कारवाई केली आहे. यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. शहरामधील विविध चौकांमध्ये तसेच गल्ल्यांमध्ये जाहिरात फलकांची उभारणी करण्यात आली होती. रामदेव गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रविवारपेठ या परिसरात ही कारवाई करून फलक जप्त करण्यात आले. हे फलक लावताना महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. गणेशोत्सवापासून आतापर्यंत झालेल्या सणांनिमित्त जाहिरातींचे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. तसेच विविध राजकीय व्यक्तींबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फलक उभे केले होते. मात्र हे फलक उभारताना नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता. यापूर्वीही कारवाई केली होती. त्यावेळी फलकांवर 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के इतर भाषा लिहिली पाहिजे, असे म्हणत कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा बेकायदेशीर फलकांची उभारणी केली म्हणून कारवाई केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.