For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकायदेशीर शस्त्रसाठा मणिपूरमध्ये जप्त

06:36 AM Jun 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेकायदेशीर शस्त्रसाठा मणिपूरमध्ये जप्त
Imphal, Jun 14 (ANI): A view of arms and ammunition recovered from the outskirts of the 5 valley districts during a joint operation of Manipur Police, CAPF, Army and Assam Rifles, in Imphal on Saturday. (Manipur Police/ANI Photo)
Advertisement

सुरक्षा दलांना मोठे यश

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमधील सुरक्षा दलांनी इंफाळ खोऱ्यातील पाच जिह्यांमधून 328 हून अधिक रायफल्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रs आणि दारूगोळा जप्त केला आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. मणिपूर पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि लष्कराच्या संयुक्त पथकांनी शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री गुप्तचर माहितीच्या आधारे केलेल्या समन्वित कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. मणिपूरमध्ये बऱ्याच काळापासून अशांतता असताना जप्त करण्यात आलेली ही शस्त्रास्त्रे म्हणजे सुरक्षा दलाला मिळालेले मोठे यश मानले जात आहे. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 151 एसएलआर, 65 इंसास रायफल्स, 73 इतर रायफल्स, पाच कार्बाइन, दोन एमपी-5 बंदुका, 12 लाईट मशीन गन, सहा एके-सिरीज रायफल्स, दोन अमोग रायफल्स, एक मोर्टार, सहा पिस्तूल, एक एआर-15 आणि दोन फ्लेअर गन यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.