For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्याने आयुष्य संपवले; घटनेनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन

10:02 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्याने आयुष्य संपवले  घटनेनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
Advertisement

मुंबई : मुंबईतील पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये शुक्रवारी एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवल्याची घटना घडली. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कॅम्पस परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल वाकोडे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून विद्यार्थ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलनाची भूमिका घेतल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवला आहे.

Advertisement

या प्रकरणाशी संबंधित तक्रार/अर्जाबाबतही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासातून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.