महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘इफ्फी’चा आज समारोप

10:41 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विविध पुरस्कार, बक्षिसांचे होणार वितरण : हॉलिवूड, बॉलिवूड सिताऱ्यांची उपस्थिती

Advertisement

पणजी : गेल्या 9 दिवसांपासून राजधानी पणजीत व इतरत्र चालू असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज मंगळवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर थाटात करण्यात येणार आहे. त्यासाठी सिनेसृष्टीतील मान्यवर दिग्गज मंडळी हजेरी लावणार असून आंतरराष्ट्रीय निर्माते मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याशिवाय सुवर्ण मयूर, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, अभिनेत्री, स्पेशल ज्युरी पुरस्कार अशा प्रकारची विविध बक्षिसे, पुरस्कार दिले जाणार आहेत.

Advertisement

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री मुऊगन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती समारोपाला लाभणार आहे. मायकल डग्लस हे पत्नीसह हजेरी लावणार असून विद्या बालन, अमित त्रिवेदी, सुखविंदर सिंग, शंतनू मोईत्रा, श्रेया घोषाल, अदिती राव - हैदरी, ए. आर. रेहमान, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल, अनुपम खेर, आयुष्मान खुराणा, पॅथरिन झेटा हे नामवंत सितारे समारोपाला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

समारोपाची सर्व तयारी पूर्ण झाली असून हिमाचल प्रदेश पोलीस दलाचा ‘हार्मोनी ऑफ द पाईन्स’ हा वाद्यवृंद तेथे आपली कला सादर करणार आहे. ‘फिदर वेट’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होणार असल्याची माहिती देण्यात आली. सोमवार दि. 20 नोव्हेंबर रोजी महोत्सवाचा पडदा उघडला होता. माधुरी दीक्षीत, शाहीद कपूर यांच्या उपस्थितीने उद्घाटन सोहळ्dयात रंगत आली. त्यानंतर सलमान खान, सनी देओल, राणी मुखर्जी यांच्या आगमनाने महोत्सवात उत्साह वाढला. काही नामवंत दिग्दर्शक, निर्माते येऊन गेले. ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पेरेशन’तर्फे मिरामार येथील मेरिएट रेसॉर्टमध्ये पाच दिवस फिल्म बाजारचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तेथील बाजाराला देश-विदेशातील चित्रपटातील संबंधित मान्यवरांनी भेट दिली. चित्रपट प्रकल्पांची माहिती घेतली. फिल्म बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article