For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोखायचे असल्यास मारावे लागणार!

06:22 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
रोखायचे असल्यास मारावे लागणार
Advertisement

ममता बॅनर्जींचे बंडखोर नेत्यांना आव्हान : विश्वासघाताचीही असते एक मर्यादा

Advertisement

वृत्तसंस्था, कोलकाता

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये जारी बंडादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे चिन्ह कुणीच हिरावून घेऊ शकणार नसल्याचे म्हणत जर मला रोखायचे असेल तर मला मारावे लागेल असे वक्तव्य केले आहे.

Advertisement

हिंमत असेल तर उघडपणे भाजपमध्ये सामील व्हा. मी संपलेय अशी तुम्हाला वाटते का? जनतेदरम्यान मी पक्षाचे निवडणूक चिन्ह घेऊन जाणार आहे. माझा आवाज कुणीच दडपू शकत नाही असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांना आव्हान दिले आहे. बंडखोर नेते आता उघडपणे भाजपसाठी काम करत आहेत. विश्वासघातालाही एक मर्यादा असते असे त्यांनी म्हटले आहे.  पक्षाच्या 20 खासदार आणि 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्याने ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेसवरील नियंत्रण धोक्यात आले आहे.

तृणमूलच्या पश्चिम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रिका भट्टाचार्य यांनी शनिवारी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या बंडखोर गटाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतुव्रत बॅनर्जी यांच्यासोबत दिसून आल्या होत्या.

पक्षासोबत विश्वासघात : ममता बॅनर्जी

माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकलेले नेते आता पक्षाचे अस्तित्वच राहिले नसल्याचे म्हणत आहेत. पक्षाने या नेत्यांना राजकीय ओळख दिली, परंतु आता तेच पक्षासोबत विश्वासघात करत आहेत आणि उघडपणे भाजपसाठी काम करत आहेत. हिंमत असेल तर या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. काही लोकांनी केंद्रीय सुरक्षा दलांच्या मदतीने तृणमूल भवनवर कब्जा केला आहे. ही कुठल्याही व्यक्तीची संपत्ती नाही, तर ‘मां, माटी, मानुष’ची संपत्ती आहे. इमारतीवर कब्जा केला जाऊ शकतो, परंतु लोकांच्या मनावर नाही असा दावा ममतादीदींनी केला.

ममतादीदींनी का दिले आव्हान?

?ममता दीदींची साथ सोडून वेगळे झालेले बंडखोर आमदार अन् खासदार सध्या भाजपमध्ये सामील झालेले नाहीत.

?3 जून रोजी तृणमूलचे 80 पैकी 58 आमदार ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील गटापासून वेगळे झाले होते.

?58 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे आणि पक्षाच्या चिन्ह आणि नावावर या गटाने दावा केला आहे.

?15 जून रोजी तृणमूलच्या 20 खासदारांनी पक्षत्याग करत त्रिपुराच्या एनसीपीआयमध्ये स्वत:चा गट विलीन केला होता

Advertisement
Tags :

.