For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गळ्यात गळे घालायचेच होते तर....? ; आ. Satej Patil यांचा महायुतीवर घणाघाती प्रहार

11:04 AM Jun 02, 2026 IST | NEETA POTDAR
गळ्यात गळे घालायचेच होते तर        आ  satej patil यांचा महायुतीवर घणाघाती प्रहार
Advertisement

                              सतेज पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल

Advertisement

कोल्हापुर -महायुतीचे सर्व नेते एकत्र असले तरी दूध उत्पादक शेतकरी माझ्या बाजूने आहेत. गळ्यात गळे घालायचेच होते तर मग गेली दोन महिने गोकुळला बदनाम का केले, याचे उत्तर निवडणुकीत द्यावेच लागेल अशी घणाघाती टीका आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी महायुतीच्या नेत्यांवर केली. महायुतीचे नेतृत्वच कमकुवत असल्याने मुख्यमंत्र्यांना प्रत्येक गोष्टीत शिरकाव करावा लागत आहे, अशी टीका करताना गेली ४० वर्षे राज्यात काँग्रेसची सत्ता असताना कधी गोकुळमध्ये हस्तक्षेप केला नव्हता याची आठवणही करून दिली.

महायुतीचे नेतृत्व कमकुवत असल्यानेच मुख्यमंत्र्यांचा शिरकाव

Advertisement

जिल्हा काँग्रेस कमिटीत सोमवारी झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार पाटील यांनी गोकुळवरून महायुतीच्या नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. शेतकऱ्यांना १० दिवसाला ८० कोटी रुपये देणारी गोकुळ संस्था टिकली पाहिजे ही आमची भूमिका आहे, तर गोकुळची सुत्रे एकाकडे जावीत यासाठी महायुतीचे नेते एकत्र आले आहेत, असा आरोपही केला. येतील त्यांना सोबत - घेउन सर्वच्या सर्व २५ जागा समविचारी पॅनेलतर्फे लढवल्या जातील असेही पाटीलयांनी स्पष्ट केले.
गोकुळवर जिल्हयातील साडेपाच लाख शेतकरी अवलंबून आहेत. गोकुळमध्ये प्रशासक नियुक्तीसंदर्भात आपण २२ वेळा मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे मुश्रीफ म्हणतात, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रशासक म्हणून अध्यक्षच नियुक्त व्हावा, असा प्रस्ताव ठेवला होता. सरकार महायुतीचे, सत्ता तुमचीच, चेअरमन तुमचाच, असे असताना ताबडतोब निवडणूक लागायला हवी होती, त्यामुळे या साऱ्या प्रक्रियेत जिल्ह्यातील नेतृत्वच कमकुवत ठरल्याचं सिद्ध होत असल्याचेही पाटील यांनी सांगितलं

गोकुळचे ठराव गोळा करणे हा पहिला टप्पा आहे. योग्य माणसाला ठराव देण्याचे ठरवावे असे संस्थाचालकांना सांगितले आहे, पण महायुतीतच भावकीचे भांडण रोज सुरू आहे. एक भावकी म्हणते बांधावरचे मांडण मिटले आहे, तर दुसरी म्हणते अजून मिटायचे आहे अजून वाटण्या व्हायच्या आहेत. पण किती संस्था रद्द होणार यावर सर्व काही ठरेल असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगडसाठी माजी आमदार राजेश पाटील यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे. आपण राजेश पाटील यांना भेटणार आहोत. सध्या ठराव गोळा करणे महत्वाचे आहे. त्यासाठी संस्थाना पत्रे पाठवली आहेत.गोकुळ असो वा जिल्हा बँक आपण शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे. दूधाला आपण २ रुपये दरवाढ दिली आहे. त्यामुळे दूध उत्पादक आपल्या बाजूने आहेत. तुम्ही गोकुळ बदनाम का केला, याचे उत्तर त्यांना निवडणुकीत द्यावे लागेल.'

आता त्यांचे लाडके भाऊ कुठे गेले?

राज्यातील ८० लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. यामध्ये दुचाकी असलेल्या, नोकरी करणाऱ्या भगिनींना वगळले आहे. पण निवडणुकीत सरसकट भगिनींना या योजनेतून लाभ दिला.
मग आता त्या अपात्र ठरल्यावर त्यांचे लाडके भाऊ कुठे गेले, असा प्रश्न त्यांनी केला.

शक्तिपीठ विरोधात स्वाभिमानी लोकांनी साथ द्यावी

आमचा विकासाला विरोध नाही, पण शक्तिपीठला आहे. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास शहरातील २९ वॉर्डमध्ये १० फुट पुराचे पाणी येईल. त्यामुळे या विरोधात ९ जूनला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता पाणी शुल्क वाढ आणली आहे. याविरोधात ५१ तक्रारी आपण दाखल केल्या आहेत. स्वाभिमानी लोकांसाठी हा संघर्ष सुरू आहे. यामध्ये जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले

Advertisement
Tags :

.