विवाह न केल्यास जाणार नोकरी
चीनच्या कंपनीची सिंगल कर्मचाऱ्यांना अजब नोटीस
चीनमध्ये विवाहांचे प्रमाण 2024 च्या तुलनेत कमी होत 6.1 दशलक्षावर आले आहे. ही संख्या मागील वर्षी सुमारे 7.68 दशलक्ष राहिली होती. याचमुण्w चीनचे सरकार आता चिंतेत पडले आहे. याचदरम्यान चीनच्या शेडोंग प्रांतातील शेडोंग शंटियन केमिकल ग्रूप कंपनी लिटिमेडने स्वत:च्या 1200 कर्मचाऱ्यांना एक अजब इशारा दिला आहे.
कंपनीने सर्व सिंगल आणि घटस्फोटित कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2025 पर्यंत विवाह करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. विवाह न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. कंपनीने आयुष्याच्या महत्त्वावर जोर देत या धोरणाला योग्य ठरविले आहे. या निर्णयासाठी कठोर टीका झल्यावर कंपनीने कथित स्वरुपात हा निर्णय मागे घेतल्याचे समजते.
28-58 वयोगटातील कर्मचाऱ्यांना इशारा
28 वर्षांपासून 58 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी ही नोटीस आहे. या अविवाहित किंवा घटस्फोटित कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत विवाह करून संसार थाटावा, जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना नोकरीतून काढून टाकले जाईल असे कंपनीने नोटीसमध्ये म्हटले आहे. कंपनीने निष्ठा आणि कौटुंबिक मूल्य यासारख्या पारंपरिक चिनी मूल्यांना चाना देण्याचे साधन म्हणून स्वत:च्या धोरणाचा बचाव केला. विवाह दरात सुधारासाठी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद न देणे विश्वासघात ठरले. स्वत:च्या आईवडिलांचे म्हणणे न ऐकणे एका मुलाचा धर्म नाही. सिंगल राहणे अजिबात चांगली गोष्ट नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीला या नोटीससाठी टीका सहन करावी लागली, यानंतर स्थानिक एचआर आणि सामाजिक सुरक्षा विभागाकडून आढावा घेण्यात आला. तसेच एका दिवसाच्या आत कंपनीला स्वत:चे धोरण रद्द करावे लागले. तसेच कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याच्या वैवाहिक स्थितीच्या आधारावर बडतर्फ केले जाणार नसल्याचे आश्वासन द्यावे लागले. ल
कायद्याचे उल्लंघन
कायदातज्ञांनी देखील या धोरणाची निंदा करत याला घटनाविरोधी ठरविले. कंपनीच्या आदेशाने चीनच्या कामगार कायदे अन् कामगार कंत्राट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे एका शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.