For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satej Patil | जि. प. त खेळ करता आला तर करूच! ; सतेज पाटील यांचा थेट इशारा

01:35 PM Feb 17, 2026 IST | NEETA POTDAR
satej patil   जि  प  त खेळ करता आला तर करूच    सतेज पाटील यांचा थेट इशारा
Advertisement

                                        अध्यक्षपदासाठी भाजप-राष्ट्रवादीत चुरस; काँग्रेस सज्ज

Advertisement

कोल्हापुर- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून गेल्या दोन दिवसांपासून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू आहे. या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहे. जिल्हा परिषदेत खेळ करता आला तर जरूर करू, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला, काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी आमदार सतेज पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती होते. काँग्रेस कमिटी कार्यालयात जि. प. पं. स. सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजीव जावळे, राजूबाबा आवळे, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, नगरसेवक राजेश लाटकर, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, डॉ. चेतन नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सतेज पाटील म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी सुरू असलेली बढाओढ दिसत आहे. या घडामोडीवर आपण लक्ष ठेवून असून जिल्हा परिषदेत खेळ करता आला तर जरूर करू जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागा मिळाल्या असून मोठा पक्ष ठरला आहे. पण मोठा भाऊ असूनही अध्यक्षपदावरून
स्पर्धा सुरू आहे. यामुळे भाजपने मोठ्या भावाला मानले नाही तर आम्ही आहे. अशी टिपणी केली. महायुतीमध्ये अध्यक्षपदावरून जोरात युद्ध सुरु असून पुढच्या काही दिवसांत महायुतीमध्ये वांदी होणार आहेत, असे भाकित केले. जिल्हा परिषदेत प्रभावी विरोधी पक्ष

Advertisement

म्हणून आपला आकडा आला आहे. केंद्राकडून राज्य शासनाला १८ हजार कोटी रुपये येणार आहेत. शासनाची हरघर नळ योजना झाली, पण पाणी येईल का नाही याची शंका आहे. अशा प्रश्नावर सभागृहात अभ्यासपूर्ण मांडणी करा. महायुतीच्या प्रचंड पैशाच्या विरोधात सामान्य माणूस म्हणून आपण लढतो. काँग्रेसचे श्रध्दास्थान असलेल्या पी.एन. पाटील यांच्या मतदारसंघातील करवीरमध्येसुद्धा दोन जागा निवडून आणल्या. पुढील निवडणुकीमध्ये कागलमध्येसुद्धा कांग्रेस निवडून येईल. राधानगरी पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होईल, असा विश्वास व्यक्त केला. 

खासदार शाहू छत्रपती यांनी आपली भक्कम विरोयी आघाडी तयार झाली आहे. निवडून आलेले सर्व सदस्य सभागृहात उत्तम कामगिरी करतील. कोल्हापूरचा परिणाम राज्यात होईल, असा विश्वास व्यक्त केला.माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, जिल्ह्यावर शाहू महाराजांचे संरकार आहेत, हे या निवडणुकीत दिसून आले. टोळकं फक्त सतेसाठी एकत्र आले आहे. पदासाठी त्यांच्यामध्ये रस्सीखेच होत आहे. आपण प्रतीक्षा करून संधीची वाट पाहूया.

सभागृहात उपद्रव मूल्य दाखवा पायात नेटके पायताण ठेवा. यामुळे निधी मिळेल. शक्तीपीठ महामार्गामुळे पूरस्थिती उद्भवणार आहे, यामुळे हा महामार्ग होऊ देऊ नका सत्ताधाऱ्यांना यामध्ये भ्रष्टाचार करून निवडणुकीत तो पैसा वापरायचा आहे. या महामार्गाचे सर्व ठेकेदार भाजपचे आमदार आहेत, असा आरोप केला. यावेळी आमदार जयंत आसगावकर,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार राजूबाबा आवळे, शिवसेनेचे संजय पवार, बिद्रीचे संचालक राहुल देसाई यांची भाषणे झाली. प्रास्ताविक माजी नगरसेवक तौफिक मुलाणी यांनी केले. या सत्कार सोहळ्याला महाविकास आघाडीचे निवडून आलेले सर्व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शक्तीपीठ,वीज'दरवाढीच्याविरोधात आंदोलन
शक्तीपीठ महामार्गाविरोधात आपले आंदोलन सुरुच आहे. भविष्यात शक्तिपीठ आणि वीज दरवाढीच्या विरोचात मोठी आंदोलन घ्यावी लागणार आहेत, असे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी १० लाखांचा धनादेश रुर्व येथील जि. प. सदस्य राहुल राजीव आवळे निवडणुकीत विजयी झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी दहा लाख रुपये देण्याचे आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी दिले होते, त्याप्रमाणे, आवळे यांचा विजय झाल्यामुळे आजच्या कार्यक्रमात खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील यांनी दहा लाखांचा चेक प्रदान केला.

Advertisement
Tags :

.