For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्ध रोखले तर सरकार पाडू!

06:47 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
युद्ध रोखले तर सरकार पाडू
Advertisement

मंत्र्याचा पंतप्रधान नेतान्याहू यांना इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी शनिवारी व्हाइट हाउसमध्ये बोलताना इस्रायल-हमास युद्ध संपण्याची वेळ आता आली असल्याचे म्हणत शस्त्रसंधी योजनेवर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त केल्याचा दावा केला. परंतु काही तासातच इस्रायलमधील बेंजामीन नेतान्याहू सरकारमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंत्री असलेले बेन ग्विर इमतार यांनी हमासच्या खात्म्यापूर्वी युद्ध थांबविले तर सरकार पाडविणार अशी धमकी दिली आहे.

Advertisement

इस्रायलने हमासविरोधी कारवाई सुरूच ठेवावी अशी बेन ग्विर यांची भूमिका आहे. हमासविरोधी कारवाई थांबविल्यास पुढील काळात पुन्हा दहशतवादी हल्ले होतील अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. याचमुळे हमासचा संपूर्ण खात्मा होत नाही तोवर युद्ध थांबविले जाऊ नये अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.

बेन ग्विर हे इस्रायलच्या सर्वात कट्टर नेत्यांपैकी एक आहेत. स्वत:च्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन ते चर्चेत असतात. बेन ग्विर हे इस्रायलमधील जहाल पक्ष रिलिजियस जियोनिस्टचे नेते आहेत. बेन ग्विर यांना कट्टरवादी ज्यू नेता माएर कहाने यांच्या काहानिस्ट विचारसरणीशी संबंधित मानले जाते.

मीर कहाने हे धर्मात्मा असल्याचे बिन-ग्विर यांचे मानणे आहे. इस्रायलमध्ये बिगर-ज्यूंना मतदानाचा अधिकार असू नये असे काहानिस्ट विचारसरणीचे मत आहे. कहाने संघटना अरब आणि मुस्लिमांना ज्यू समुदाय आणि इस्रायलचे शत्रू मानते.

Advertisement
Tags :

.