For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दबाव निर्माण केला तर भारत सोडू!

06:03 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दबाव निर्माण केला तर भारत सोडू
Advertisement

व्हॉटसअॅपने नवीन आयटी नियमांना दर्शवला विरोध

Advertisement

नवी दिल्ली :

आम्ही भारतात सेवा देणे बंद करु का? असे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉटसअॅपने दिल्ली उच्च न्यायालयाला म्हटले आहे. मेटाच्या दोन मोठ्या प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि फेसबुकने नवीन सुधारित आयटी नियमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केली.

Advertisement

नवीन नियमांमुळे यूजर्सची गोपनीयता धोक्यात : कंपनी

कंपनीने न्यायालयात सांगितले की, नवीन नियमांमुळे यूजर्सची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले...

व्हॉट्सअॅपच्यावतीने अधिवक्ता तेजस कारिया तर सरकारच्या वतीने कीर्तीमान सिंग युक्तिवाद करत होते. उभय पक्षांमध्ये अल्पशा चर्चेनंतर उच्च न्यायालयाने मध्यममार्ग काढण्यास सांगितले.

 व्हॉट्सअॅपच्या 3 मोठ्या गोष्टी

? आयटी नियम 2021 वापरकर्त्यांची गोपनीयता एक्रिप्शनसह कमकुवत करते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 19 आणि 21 अंतर्गत मूलभूत अधिकारांचेही उल्लंघन करते.

? जगात कुठेही असे नियम नाहीत, अगदी ब्राझीलमध्येही नाही. हा नियम वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या विरोधात आहे.

? आम्हाला एक संपूर्ण साखळी ठेवावी लागेल आणि सरकार कोणते संदेश मागू शकेल हे आम्हाला माहित नाही. म्हणजे लाखो संदेश वर्षानुवर्षे साठवून ठेवावे लागतील.

सरकारचे म्हणणे

यापूर्वी केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा व्यावसायिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी विकतात. त्यामुळे, कायदेशीररित्या कंपनी गोपनीयतेचे संरक्षण करते असा दावा करू शकत नाही.

Advertisement
Tags :

.