टार्गेट पूर्ण न झाल्यास खाव्या लागणार मिरच्या
चीनमध्ये काही कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये लागू कठोर आणि अपमानास्पद नियम तसेच प्रथांची प्रकरणे समोर आली आहेत. या कंपन्यांवर कठोर टीका देखील होत आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कर्मचाऱ्यांना विचित्र आणि अमानवीय दंड देण्याचे व्हिडिओ समोर आल्यावर तेथील कार्यसंस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ग्वांगजू येथील एका कंपनीत काम करणाऱ्या लोकांना स्वत:च्या बॉसला असाधारण पद्धतीने अभिवादन करण्यास सांगण्यात येते, यात सामान्य स्वरुपात गुड मॉर्निंग किंवा हॅलो ऐवजी जमिनीवर आडवे पडून सन्मान दाखविण्यास सांगण्यात आले. तर याचबरोबर कर्मचाऱ्यांना बॉस आणि कंपनीची प्रशंसा करत नारे देण्यास भाग पाडण्यात आले. एका व्हायरल व्हिडिओत कर्मचारी एका सुरात ओरडताना दिसून येतात. यात सर्व कर्मचारी जमिनीवर पहुडल्याचे दिसून येते सर्व जण चीमिंग ब्रँच बॉस हुआंग यांचे स्वागत करतो. चीमिंग ब्रँचमध्ये काम करताना आम्ही जिवंत राहिलो किंवा आमचा मृत्यू झाला तरीही कामादरम्यान आम्ही कधीच अयशस्वी ठरणार नसल्याचे हे कर्मचारी म्हणताना दिसून येते.
या व्हिडिओने सोशल मीडियावर लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि आक्रोश निर्माण केला. अनेक लोकांनी या प्रथांना अपमानास्पद आणि अमानवीय ठरविले. परंतु कंपनीचे कायदेशीर प्रतिनिधी लियु यांनी या व्हिडिओला बनावट ठरवत हे फुटेज एडिटेड असू शकते असे म्हटले आहे.
दंडादाखल तिखट मिरची खाणे
अन्य एका घटनेत एका वित्तीय फर्मच्या कर्मचाऱ्यांना स्वत:चे टार्गेट पूर्ण न केल्याप्रकरणी अत्यंत तिखट मिरच्या खाव्या लागल्या आहेत. या मिरचींना डेथ चिलीज म्हटले जाते. या दंडामुळे दोन महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावा लागले. डेथ चिलीज यासारख्या दंडाचा वापर चीनमध्ये नवा नाही. परंतु ऑफिसमध्ये ही प्रथा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधले गेले. ही कूर आणि असंवेदनशील पद्धत कार्यस्थळाच्या विषाक्त संस्कृतीचे प्रतीक असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.
चीनमध्ये त्रासदायक नियम
चीनमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये ग्वांगझू येथील कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 1,80,00 पावले चालण्याचे लक्ष्य देले होते, हे पूर्ण न केल्यास वेतन कपात करण्याचा इशारा देण्यात आला होता. तर हेनान येथील प्रॉपर्टी मॅनेमजेंट कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वजनावर कठोर नियम लागू करत अधिक वजन असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला होता.
कामाच्या नावावर सन्मानाकडे दुर्लक्ष
या घटनांनी चीनच्या कॉर्पोरेट संस्कृतीमधील गंभीर समस्या उघडकीस आणली आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांकडून निष्ठेच्या प्रदर्शनाच्या नावावर वैयक्तिक सन्मान आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचवत आहेत. चीनच्या कामगार कायद्यांनुसार अशा प्रथांवर बंदी आहे. तरीही या कायद्यांची अंमलबजावणी अद्याप कमजोर आहे.