Satara Politics : कार्यकर्त्यांना डिवचले तर करेक्ट कार्यक्रम ; पालकमत्री शंभूराज देसाई यांचा इशारा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विरोधकांना थेट इशारा
सणबूर : देसाई गटात धाडसाने प्रवेश करण्प्रया कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या पाठीशी माझी संपूर्ण ताकद आहे. माझ्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचे किंवा घाबरवण्याचे काम कोणी करू नये. असे कोणी केल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम होईल, अशा शब्दांत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना थेट इशारा दिला.
ढेबेवाडी येथे संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सणबूरचे माजी उपसरपंच आणि सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मंत्री देसाई म्हणाले, मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात मला साडेसात हजारांचे मताधिक्य मिळाले ते फक्त विकासाच्या जोरावर. येणाऱ्या निवडणुकीत या गटाबर माझे बारकाईने लक्ष राहील. 'बारकाईने' हा शब्द अंडरलाईन करून ठेवा, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांना थेट संदेश दिला.बाजार समितीला जसा करेक्ट कार्यक्रम करून दाखवला, तसाच या गटातही करून दाखवू ही फक्त घोषणा नाही निर्णय आहे, असेही ते म्हणाले.
देसाई पुढे म्हणाले, मराठवाडी धरण परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले,जाणार आहे. त्यामुळे येथील तरुणांसाठी नवे रोजगार उपलब्ध होतील.दरम्यान, संतोष गिरीगोसावी, विजय पवार, रणजीत पाटील, मनोज मोहिते, संजय लोहार यांनी शिवसेना देसाई गटामध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमास विजय पवार, संतोष गिरी, हणमंतराव पवार, नितीन काळे, दिलीपराव जानुगडे, मनोज पाटील, सुनिता देशमुख, रुपाली पाटील, भाग्यश्री पाटील, भारती विभुते, ज्योतिराज काळे, शिवाजी शेवाळे, बिकास गोसावी, टी. डी. जाधव, सर्जेराव जाधव, सचिन जाधव, जयवंतराव देशमुख, रामराव देशमुख, रामचंद्र सुतार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.