For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

समुद्र वाढल्यास घुसखोर जीव करणार नव्या भागांवर कब्जा

06:21 AM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
समुद्र वाढल्यास घुसखोर जीव करणार नव्या भागांवर कब्जा
Advertisement

122 सागरी प्रजातींवर चकित करणारे अध्ययन

Advertisement

हवामान बदलामुळे समुद्राचे पाणी सातत्याने वाढत आहे, याचा प्रभाव केवळ किनारी जमिनी बुडण्यापुरती मर्यादित राहणार नाही. एका नव्या अध्ययनानुसार समुद्राचे पाणी वाढल्याने अशा सागरी जीवांना नव्या भागांमध्ये फैलावण्याची संधी मिळू शकते, जे तेथील मूळ जीव नाहीत. वैज्ञानिकांनी 122 सागरी इनवेसिव स्पीशीजवर अध्ययन करत समुद्राची पातळी वाढल्याने त्यांचा धोका कुठे वाढू शकतो हे शोधले आहे.

अध्ययनानुसार 2050 पर्यंत समुद्राचे वाढते पाणी सुमारे 3.6 लाख चौरस किलोमीटर किनारी जमिनीला बुडवू शकते. 2100 पर्यंत हा आकडा सुमारे 5.5 लाख चौरस किलोमीटर होऊ शकतो. पाण्यात जाणाऱ्या या नव्या भागांच्या मोठ्या हिस्स्यात सागरी इनवेसिव स्पीशीजच्या राहण्यासाठ योग्य वातावरण निर्माळा होऊ शकते असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

Advertisement

वैज्ञानिकांनी ज्या 122 प्रजातींना पाहिले, त्यात मासे, क्रस्टेशियन, मोलस्क आणि सी स्टार यासारख्या सागरी प्रजाती सामील आहेत. हे जीव स्वत:च्या मूळ भागातून बाहेर इतर हिस्स्यांमध्ये पूर्वीच फैलावलेले आहेत. अध्ययनांमध्ये वेगवेगळ्या हवामान स्थितीच्या आधारावर समुद्र वाढल्यावर या प्रजाती कोणत्या नव्या भागांपर्यंत पोहोचू शकतात हे पाहिले गेले आहे.

समुद्राची पातळी वाढण्याची दोन मोठी कारणे आहेत, पहिले समुद्राचे पाणी तप्त झाल्यावर फैलावते, दुसरे ग्लेशियर आणि आइस शीट वितळल्याने समुद्रात अधिक पाणी पोहोचते. अध्ययनाच्या अनुमानानुसार 2050 पर्यंत समुद्राची पातळी सुमारे 20 सेंटीमीटर आणि 2100 पर्यंत सुमारे 56 सेंटीमीटरने वाढू शकते.

3.6 लाख चौरस किलोमीटर भूभाग

अध्ययनानुसार 2050 पर्यंत सुमारे 3.6 लाख चौरस किलोमीटर किनारी जमीन समुद्रात सामावू शकते. 2100 पर्यंत हा भाग वाढून सुमारे 5.5 लाख चौरस किलोमीटर होऊ शकतो. यातील सुमारे 2.9 लाख ते 4.7 लाख चौरस किलोमीटर जमिनीवर अशा सागरी जीवांच्या वास्तव्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यांचे अध्ययन करण्यात आले आहे. म्हणजेच समुद्राचे पाणी वाढल्याने या प्रजातींसाठी नवे भाग खुले होऊ शकतात.

या भागांमध्ये अधिक धोका

अध्ययनात जगातील अशा अनेक भागांचा उल्लेख करण्यात आले आहे, जेथे या सागरी जीवांच्या फैलावण्याचा धोका अधिक असू शकतो. यात अमेरिकेचा पूर्व किनारा, गल्फ ऑफ मेक्सिको, नॉर्थ सी, गल्फ ऑफ गिनी, अरेबियन गल्फ, उत्तर बंगाल उपसागर, दक्षिणपूर्व चीन आणि उत्तर ऑस्ट्रेलिया सामील आहे. एस्ट्यूरी म्हणजेच नदीचे पाणी जेथे समुद्रात सामावते, तेथे धोका अधिक असू शकतो. या भगांचा समुद्राशी थेट कनेक्शन असते. तसेच येथे मानवी घडामोडीही अधिक होतात. समुद्राचे पाणी वाढल्यावर ही ठिकाणं इनवेसिव स्पीशीजसाठी नव्या भागांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरू शकतात.

अनेक प्रजातींचा यापूर्वीच फैलाव

अनेक सागरी प्रजाती या स्वत:च्या मूळ भागाच्या बाहेर फैलावल्या आहेत. युरोपमध्ये पॅसिफिक ऑयस्टर, अटलांटिक ब्ल्यू क्रॅब आणि वेन्ड रापा व्हेल्क याचे उदाहरण आहेत. समुद्राचे पाणी वाढल्यावर या जीवांना नव्या भागांपर्यंत पोहोचणे आणि तेथे राहण्याची संधी मिळू शकते. यामुळे तेथे पूर्वीपासून असलेल्या स्थानिक प्रजातींसाठी समस्या वाढू शकते. या जीवांदरम्यान अन्न आणि राहण्याच्या जागेवरून संघर्षही होऊ शकतो.

पर्यावरणासोबत अर्थव्यवस्थेवरही प्रभाव

इनवेसिव स्पीशीजचा प्रभाव केवळ सागरी जीवांवर पडत नाही, हे पूर्ण इकोसिस्टीमला बदलू शकते. याचा प्रभाव मासेमारी आणि किनारी भागांशी निगडित इतर कामांवरही पडू शकतो. 2019 मध्ये जगभरात बायोलॉजिकल इनवेजनमुळे 423 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकचे आर्थिक नुकसान झाले होते. समुद्राची पातळी वाढण्यासोबत इनवेसिव स्पीशीज फैलावण्याच्या धोक्यालाही किनारी भागांचे प्लॅनिंग आणि देखरेखीत विचारात घ्यावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.