For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सोमवारी निर्णय झाला नाही तर मंगळवारी कर्नाटक बंद

06:17 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोमवारी निर्णय झाला नाही तर मंगळवारी कर्नाटक बंद
Advertisement

शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांचा पत्रकार परिषदेत इशारा : राज्य-केंद्र सरकारने समन्वयाने निर्णय घ्यावा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सोमवार दि. 26 रोजी बेळगावमध्ये शेतकरी व कारखानदारांची बैठक घेणार आहेत. यामध्ये ऊसदराबाबत चर्चा करून प्रश्न निकाली काढला जाणार आहे. मात्र या बैठकीत दराबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही तर मंगळवार दि. 27 रोजी गुर्लापूर येथे आंदोलन करत कर्नाटक बंद करण्याचा इशारा राज्य शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी दिला.

Advertisement

येथील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुजारी म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तात्काळ कारखानदारांची बैठक घेऊन एफआरपीबाबत चर्चा करावी. तसेच एमएसपीबाबतही गांभीर्याने चर्चा करून साखरेला 50 ते 60 रुपयांपर्यंत एमएसपी जाहीर करावी. केंद्र व राज्य सरकारांची जबाबदारी वेगळी असली तरी दोन्ही सरकारांनी समन्वय ठेवून निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारच्या बैठकीत एफआरपी वगळता एसएपीअंतर्गत 1 हजार रुपये प्रोत्साहन जाहीर करावे. तसेच कारखानदारांची बैठक घेऊन उसाला प्रतिटन 4500 दर जाहीर करावा. राज्यातील सर्व कारखान्यांच्या वजनामध्ये तफावत होते. हे टाळण्यासाठी 500 कोटी राखीव ठेवण्यात यावेत. तसेच बेळगावमधील साखर आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणीही पुजारी यांनी केली.

सोमवारच्या बैठकीत तोडगा निघाला नसल्यास गुर्लापूर येथे आंदोलन करण्यात येणार असून लाखो शेतकरी सहभागी होणार आहेत. तसेच मंगळवारी कर्नाटक बंद करून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू. यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा सोमवारी निर्णय घ्यावा. आपल्याला राजकारणात कोणताही रस नसून आपण निवडणूक लढवणार नाही. संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करत राहणार असल्याचेही पुजारी यांनी सांगितले. यावेळी किशन नंदी, प्रेम चौगुला उपस्थित होते.

Advertisement

.