महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केवायसी न केल्यास फास्टॅग आजपासून बंद होणार

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बँका निक्रिय करतील किंवा काळ्या यादीत टाकणार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी बँकेतून अपडेट केले नसेल, तर आजच ते पूर्ण करा. कारण 29  फेब्रुवारीनंतर बँका केवायसी शिवाय फास्टॅग निक्रिय करतील किंवा ब्लॅकलिस्ट करतील. यानंतर फास्टॅगमध्ये शिल्लक असूनही पेमेंट केले जाणार नाही. एनएचएआय फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या नियमांनुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे, जेणेकरून फास्टॅग सुविधा कोणत्याही अडचणीशिवाय प्रदान करता येईल. ग्राहकांना आता एका वाहनात फक्त एकच फास्टॅग वापरता येणार आहे.

एनएचएआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की फास्टॅग वापरकर्त्यांना ‘एक वाहन, एक फास्टॅग’ धोरणाचे पालन करावे लागेल आणि पूर्वी जारी केलेले सर्व फास्टॅग त्यांच्या संबंधित बँकांना परत करावे लागतील. आता फक्त नवीन फास्टॅग खाती सक्रिय राहतील. पारदर्शकता आणण्यासाठी आणि फास्टॅगद्वारे टोल वसूल करण्यासाठी टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी एनएचएआयने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ मोहीम सुरू केली आहे. आरबीआय नियमांचे उल्लंघन करून केवायसी शिवाय एका वाहनासाठी अनेक फास्टॅग जारी केल्याच्या आणि फास्टॅग जारी केल्याच्या अलीकडील काही घटनांनंतर एनएचएआयने वरील मोहीम हाती घेतली आहे.

फास्टॅग वापरल्याने वाहनचालकांना टोल टॅक्स भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. याचा वापर टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी करण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी केला जातो. तुम्ही बँक आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून फास्टॅग खरेदी करू शकता. तुम्ही देशातील कोणत्याही टोल प्लाझावरून फास्टॅग खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही ते अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक बँकेच्या शाखांमधून देखील खरेदी करू शकता. तुम्ही पेटीएम, अॅमेझॉन, गुगल पे सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून देखील ते खरेदी करू शकता.फास्टॅग खरेदी करताना तुमच्याकडे ओळखपत्र आणि वाहन नोंदणीचे कागदपत्र असणे आवश्यक आहे.

फास्टॅग म्हणजे काय?

फास्टॅग हा टॅग किंवा स्टिकरचा एक प्रकार आहे. हे वाहनाच्या विंडक्रीनवर बसवलेले असते. फास्टॅग रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन किंवा आरएफआयडी तंत्रज्ञानावर काम करते. या तंत्रज्ञानाद्वारे, टोल प्लाझावर बसवलेले कॅमेरे स्टिकरचा बार-कोड स्कॅन करतात आणि टोल फी आपोआप फास्टॅग वॉलेटमधून कापली जाते. हे काम इतक्या वेगात होतं की वाहनचालकाला टोल प्लाझावर थांबावे लागत नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article