For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आम्ही नसतो, तर तुम्ही फ्रेंच बोलत असता!

07:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आम्ही नसतो  तर तुम्ही फ्रेंच बोलत असता
Advertisement

ट्रम्प यांना किंग चार्ल्स यांचे जशास तसे प्रत्युत्तर : इतिहासाची करून दिली आठवण

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय यांनी व्हाइट हाउसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका मजेशीर टिप्पणीद्वारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा संदेश दिला आहे.  अमेरिका नसता, तर युरोपचे अनेक देश आज जर्मन भाषेत बोलत असते, असे ट्रम्प यांनी संभाषणादरम्यान चार्ल्स यांना सांगितले होते. ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धाची आठवण करून देत जर्मनीचा पूर्ण युरोपवर कब्जा झाला असता असे सांगितले.

Advertisement

ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये आलेल्या अनेक विदेशी अतिथींना कमी लेखण्याचा प्रकार कित्येकदा केला आहे. परंतु यावेळी ट्रम्प यांच्या शैलीतच किंग चार्ल्स यांनी त्यांना दिलेले प्रत्युत्तर चर्चेत राहिले आहे. अध्यक्ष ट्रम्प हे अमेरिका नसता तर युरोप जर्मनभाषिक झाला असता असे सांगत आहेत, परंतु मी जर ब्रिटन नसता तर ट्रम्प हेच फ्रेंच भाषेतून बोलत असते असे सांगू इच्छितो असे किंग चार्ल्स यांनी म्हटल्यावर उपस्थित लोकांना हसू अनावर झाले.

अमेरिकेने हस्तक्षेप केला नसता तर युरोपचे अनेक देश जर्मन भाषा बोलत असते असे म्हणत ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धाकडे इशारा केला होता. तर ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांनी प्रत्युत्तरादाखल इतिहासाचा दुसरा पैलू समोर ठेवला.  1776 मध्ये अमेरिकेने ब्रिटनपासून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, तेव्हा फ्रान्सने अमेरिकेला महत्त्वपूर्ण सैन्यरसद पुरविली होती. या मदतीशिवाय अमेरिकेला स्वातंत्र्य मिळविणे अवघड होते. तसेच अमेरिकेची स्थापना होण्यापूर्वी तेथील अनेक हिस्स्यांवर फ्रान्सचा कब्जा होता आणि त्याला न्यू फ्रान्स असेही म्हटले जात होते.

जाळले होते व्हाइट हाउस

ब्रिटन आणि अमेरिकेत 1812 साली युद्ध झाले होते. याच युद्धादरम्यान ब्रिटनच्या सैन्याने वॉशिंग्टन डीसीवर कब्जा केला होता आणि 1814 मध्ये व्हाइट हाउस आगीच्या हवाली केले होते.

Advertisement
Tags :

.