महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूर-नागालँडला जोडणाऱ्या पूलावर आयईडी स्फोट

06:44 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उग्रवाद्यांचा हात असल्याचा संशय : अवजड वाहनांची वाहतूक रोखली

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

हिंसाग्रस्त मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील एका पूलाचे बुधवारी पहाटे झालेल्या आयईडी स्फोटात नुकसान झाले आहे. आयईडी स्फोटानंतर परिसरातील वाहतूक प्रभावित झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सपरमीना आणि कुब्रू लीखा भागांमधील पूलावर हा स्फोट झाला आहे. आयईडी स्फोटामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. पूलाच्या दोन्ही टोकाला तीन ख•s आणि तडे गेल्याचे दिसून आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

मणिपूरची राजधानी इंफाळला नागालँडच्या दीमापूरशी जोडणाऱ्या पूलावर अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यात आली आहे. स्फोटानंतर त्वरित पोलिसांनी तेथे धाव घेत पूल परिसरात शोधमोहीम हाती घेतली होती. आयईडी स्फोटप्रकरणी चोकशी करयणत आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article