महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समुद्रात 15 मीटर खाली मूर्ती

06:05 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मूर्तीच्या सान्निध्यात विवाह करण्यास पसंती

Advertisement

जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, यातील काही माणसानेच निर्मिल्या आहेत. क्राइस्ट ऑफ द एबिस अशीच एक अंडरवॉटर मूर्ती असून ती जगभरातील विविध स्थानांवर स्थित आहे. या आकर्षक मूर्ती येशू ख्रिस्त समुद्र तळाला उभा राहून स्वत:चे हात पसरविलेल्या स्थितीत दर्शविण्यात आला आहे. ही मूर्ती पाणबुडे आणि सागरी जीवन दोघांसाठी शांतता, आशा आणि सुरक्षेचे प्रतीक आहे.

Advertisement

क्राइस्ट ऑफ द एबिस भूमध्य समुद्रात स्थित येशू ख्रिस्ताची एक विस्मयकारी जलमग्न कांस्याची प्रतिमा आहे. ही मूर्ती खोलवर शोध घेणाऱ्या पाणबुड्यांसाठी आशा आणि सुरक्षेचे प्रतीक म्हणून कार्य करते. इटालियन कलाकार गुइडो गॅलेटी यांनी याची निर्मिती केली होती. क्राइस्ट ऑफ द एबिसची मूळ प्रतिमा  इटलीच्या किनाऱ्यावर स्थित आहे, परंतु याच्या दोन प्रतिकृतीही निर्माण करण्यात आल्या आहेत. यातील एक फ्लोरिडाच्या लार्गोच्या किनाऱ्यावर तर दुसरी ग्रेनेडच्या सेंट जॉर्जमध्ये स्थापित करण्यात आली आहे.

इटलीत क्राइस्ट ऑफ द एबिसनजीक जाण्यासाठी पुरेसे साहस असणे आवश्यक आहे. कारण ही मूर्ती जवळपास 15 मीटर खोलवर समुद्रतळावर विराजमान आहे.  इटलीत क्राइस्ट ऑफ द एबिस दरवर्षी हजारो पाणबुड्यांना आकर्षित करते. आज ही प्रतिष्ठित मूर्ती एक पसंतीचे पाणबुड्यांचे स्थळ ठरले आहे.

लार्गोमध्ये क्राइस्ट ऑफ द एबिसची मूर्ती एका जिवंत कोरल रीफ सिस्टीमने वेढलेली आहे.  जॉन पेनकेम्प कोरल रीफ स्टेट पार्कच्या आत स्थित क्राइस्ट ऑफ द एबिसची की लार्गोतील प्रतिकृती रंगीत कोरल संरचनांनी सजलेली आहे. पाणबुड्यांसाठी येथे एक आकर्षक पार्श्वभूमी प्रदान होते. क्राइस्ट ऑफ द एबिस पाण्याखालील विवाहांसाठी एक लोकप्रिय स्थळ आहे.

पाणबुडे अनेकदा क्राइस्ट ऑफ द एबिसमध्ये स्वत:चे प्रतीक सोडतात, पाणबुडे पाण्याखालील जगताशी स्वत:च्या संबंधांच्या संकेताच्या स्वरुपात क्रॉस, धार्मिक अवशेष आणि वैयक्तिक वस्तूंसारखी छोटी स्मृतिचिन्हे सोडून देत असतात. कला, धर्म आणि निसर्गाच्या मिश्रणाच्या स्वरुपात क्राइस्ट ऑफ द एबिस एक सांस्कृतिक प्रतीक आहे, जे अनेक लोकांना जोडण्याचे काम करते. अनेक पाणबुड्यांनी क्राइस्ट ऑफ द एबिसमुळे मिळणारी शांतता आणि अध्यात्मिक ओढ व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article