आयडीएफसी फर्स्टचा समभाग कोसळला
06:32 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
खासगी क्षेत्रातील बँक आयडीएफसी फर्स्ट यांचे समभाग सोमवारी मोठ्या प्रमाणात कोसळलेले पहायला मिळाले. जवळपास 20 टक्क्यांपर्यत समभाग घसरणीत राहिले होते. चंदिगडमधील बँकेच्या शाखेमध्ये 590 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी जाहिर होताच त्याचे शेअरबाजारात बँकेच्या समभागांवर नकारात्मक परिणाम दिसले. सोमवारी आयडीएफसी फर्स्टचा समभाग 20 टक्के इतका घसरत 66 रुपयांवर खाली आला होता. जून 2025 नंतर बँकेच्या समभागाच्या भावाने नीचांकी स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले.
Advertisement
Advertisement