For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयडीएफसी फर्स्ट बँकेचा नफा 132 टक्क्यांनी वाढला

06:34 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयडीएफसी फर्स्ट बँकेचा  नफा 132 टक्क्यांनी वाढला
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून 2026) निकाल जाहीर केले आहेत. जून 2026 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत 132.2 टक्क्यांनी वाढून 1,075 कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत बँकेने 463 कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. बँकेच्या नफ्यातील ही मोठी वाढ मजबूत निव्वळ व्याज उत्पन्न आणि कमी तरतुदीमुळे झाली आहे.

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 21 टक्क्यांनी वाढले. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न  म्हणजेच मिळवलेले व्याज आणि दिलेले व्याज यातील तफावत वार्षिक तुलनेत 21 टक्क्यांनी वाढून 5,972 कोटींवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते 4,933 कोटी रुपये होते. ही वाढ बँकेच्या मुख्य कर्ज व्यवसायातील मजबुत कामगिरी दर्शवत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.