For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खरा शत्रू ओळखा अन् एकजूट व्हा

06:44 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
खरा शत्रू ओळखा अन् एकजूट व्हा
Advertisement

मोजतबा खामेनेईंचा आखाती देशांना संदेश

Advertisement

  वृत्तसंस्था/ तेहरान

अमेरिकेसोबत जारी तणावादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांनी आखाती देशांच्या शासकांना स्वत:चा खरा शत्रू ओळखण्याचे आणि एकजूट होत परस्परांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. लेखी संदेश जारी करत खामेनेई यांनी मुस्लिमांदरम्यान एकता आणि शत्रूंच्या विरोधात परस्पर सहकार्यावर जोर दिला.

Advertisement

युद्ध सुरू झाल्यापासून खामेनेई अद्याप सार्वजनिक स्वरुपात दिसून आलेले नाही. सुमारे 6 महिन्यांपूर्वी अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात जखमी झाल्यापासून ते सार्वजनिक रुपात नजरेस पडलेले नाहीत. अलिकडच्या काळात त्यांच्या आरोग्यावरून अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. याच महिन्याच्या प्रारंभी जारी एका व्हिडिओत त्यांना धर्मगुरुंसोबत धार्मिक-अकॅडमिक चर्चेत भाग घेताना दाखविण्यात आले होते.

इराण अमेरिकेसोबतच्या युद्धाचा आर्थिक प्रभाव आणि निर्बंधांचा सामना करत असताना हा संदेश जारी करण्यात आला आहे. यापूर्वी खामेनेई यांच्या नावाने जारी अन्य एका लेखी वक्तव्यात सरकारला महागाई, बेरोजगारी, बाजार व्यवस्थापन यासारख्या आर्थिक-उपजीविका संबंधी आव्हानांवर गांभीर्याने उपाय करण्याची सूचना करण्यात आली होती.

इराण कूटनीति आणि संरक्षण दोन्ही मार्ग अवलंबिणार असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. कूटनीति आणि संरक्षणाला राष्ट्रीय हित, सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी ‘दोन पूरक, समन्वित आणि अविभाज्य घटक’ ठरविण्यात आले आहे. याचदरम्यान कूटनीतिक प्रयत्नही जारी आहेत. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी गुरुवारी तेहरानमध्ये इराणच्या नेत्यांची भेट घेतली होती. इराणचे विदेशमंत्री अब्बस अराघची यांनी या चर्चांना ‘रचनात्मक’ ठरविले आहे.

Advertisement
Tags :

.