For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामाच्या माध्यमातुन आदर्श खासदार कसा असतो ते दाखवून देऊ : सत्यजीत पाटील - सरुडकर

05:44 PM Apr 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
कामाच्या माध्यमातुन आदर्श खासदार कसा असतो ते दाखवून देऊ   सत्यजीत पाटील   सरुडकर
Advertisement

सरुड : वार्ताहर

सर्वसामान्य जनता हेच आपले कुटुंब मानत आजपर्यंत आपण राजकारण व समाजकारण करत आलो आहे . याच जनतेच्या पाठबळावर येत्या लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन आदर्श खासदार कसा असतो ते आपण आपल्या कामाच्या माध्यमातुन दाखवून देऊ असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजीत पाटील - सरुडकर यांनी केले .

Advertisement

सरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरुडकर हे होते . तर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड , युवराज पाटील - सरुडकर हे प्रमुख उपस्थित होते .

सत्यजीत पाटील पुढे म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या विश्वासाने मला लोकसभेची उमेदवारी दिली आहे . याच विश्वासाने या निवडणूकीत आपण सर्वानी त्यांच्या आदेशाला साजेल असे एकसंघपणे काम करुन त्यांना अपेक्षीत असा निकाल देण्यासाठी या मतदारसंघात विजयाची मशाल पेटवूया . आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच संपुर्ण हातकणंगले मतदारसंघात तयार झालेले परिवर्तनाचे वारे पाहता येथील जनतेनेच या निवडणूकीत परिवर्तन घडवून आणण्याचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे . या निवडणूकीच्या माध्यमातून आपण मतदारसंघाच्या विकासासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही सत्यजीत पाटील यांनी यावेळी सांगीतले . जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड म्हणाले , लोकसभेच्या या निवडणूकीत सत्यजीत पाटील यांच्या विजयासाठी माझ्यासह मानसिंगराव गायकवाड गटाचे सर्व कार्यकर्ते पुर्ण ताकदीनिशी सत्यजीत पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत . त्यामुळे लवकरच सत्यजीत पाटील हे खासदार म्हणून लोकसभेत दिसतील .

Advertisement

अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरुडकर म्हणाले , कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आपल्या हक्काचा खासदार म्हणून सत्यजीत पाटील यांना खासदार करायचे या निर्धाराने सर्वांनी संघटितपणे काम केले पाहिजे .
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले , उपप्रमुख नामदेव गिरी , माजी जि . प . सदस्य हंबीरराव पाटील , माजी सभापती विजय खोत , ॲड . विजयसिंह पाटील - उत्रेकर , इचलकरंजीचे नगसेवक नितीन कोकणे , पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी , शाहूवाडी तालुकाप्रमुख दत्तात्रय पवार , बाजीराव पाटील ( घोटवडे ) वरेवाडीचे सरपंच आनंदा पाटील आदीनी आपली मनोगते व्यक्त केली .

या मेळाव्यास डी . जी . पाटील ( कोतोली ) माजी सभापती पांडुरंग पाटील , नामदेवराव पाटील - सावेकर , दिलीप पाटील - कोतोलीकर , जालींदर पाटील - रेठरेकर , स्नेहा जाधव , मुरारी पाटील ( कोलोली ) , भीमराव पाटील ( सरुड ) पन्हाळा तालुका प्रमुख बाबासो पाटील - जाफळेकर , गोल्डी पाटील ( कोडोली ) भीमराव पाटील ( सोंडोली ) ,अलका भालेकर ,आदी मान्यवरांसह शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुत्रसंचालन प्रा . प्रकाश नाईक यांनी केले तर आभार भेडसगावचे माजी सरपंच अमरसिंह पाटील यांनी मानले .

Advertisement
Tags :

.