आयसीआयसीआयचे समभाग घसरणीत
06:22 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी दुसरी खासगी बँक आयसीआयसीआय बँकेचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून त्याचा नकारात्मक परिणाम समभागावर पाहायला मिळाला. सोमवारी शेअर बाजारामध्ये बँकेचा समभाग इंट्रा डेदरम्यान 4 टक्के घसरत 1360 च्या स्तरावर कार्यरत राहिला होता. याच दरम्यान सकाळी समभाग 1392 रुपयांवर खुला झाला होता. आयसीआयसीआय बँकेने तिसऱ्या तिमाहीत 11318 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला. मागच्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत नफा 4 टक्के कमी होता.
Advertisement
Advertisement