आयसीआयसीआय प्रुडेन्शीयलचा येणार आयपीओ
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट आपला आयपीओ शेअर बाजारामध्ये लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीओ किती कोटी रुपयांचा असणार आहे इशुची किंमत याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
विविध बँकांशी चर्चा
कंपनीची व्यवस्थापनाअंतर्गतची मालमत्ता ही नऊ लाख कोटी रुपयांची असून आयसीआयसीआय बँक आणि प्रुडेन्शियल यांच्यातली संयुक्त कंपनी आहे. ज्यामध्ये बँकेची हिस्सेदारी 51 टक्के आणि प्रुडेन्शीयलची टक्केवारी 49 टक्के आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कंपनीने आयपीओ सादरीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून यासंदर्भात विविध व्यापारी बँकांशी चर्चाही सुरू केली असल्याचे समजते.
4 म्युच्युअल फंड कंपन्या सुचीबद्ध
सध्याला पाहता म्युच्युअल फंडांचा विचार करता एचडीएफसी, निप्पॉन लाईफ इंडिया, यूटीआय आणि आदित्य बिर्ला सन लाइफ या कंपन्या शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध आहेत. एचडीएफसी यांची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता ही 7.89 लाख कोटींची आहे. ही कंपनी सध्याला म्युच्युअल फंडांच्या एकंदर हिस्सेदारीमध्ये पाहता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेक्सावेअरचा आयपीओ 2.7 पट सबस्क्राइब
याचदरम्यान बाजारात दाखल झालेला हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचा आयपीओ 2.7 पट पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सबस्क्राइब झाला आहे. 8750 कोटी रुपये या आयपीओतून उभारले जाणार असून आयटी सेवा क्षेत्रातला भारतातला सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे. 674-708 रुपये प्रति समभाग अशी इशु किंमत ठेवण्यात आली आहे.
इनोव्हेटीव्हीव्ह इंडियाचा अर्ज
याचदरम्यान नोएडा येथील कंपनी इनोव्हेटीव्हीव्ह इंडिया ही कंपनीही आपला आयपीओ आणणार असून याकरीता कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे आपला अर्ज सादर केला आहे. या आयपीओतून कंपनी 2 हजार कोटी रुपये उभारणार आहे. आशिश मित्तल आणि अंकीत अग्रवाला यांच्याकडून अनुक्रमे 800 कोटी, 320 कोटी रुपयांचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.