आयसीआयसीआय प्रुडेन्शीयलचा समभाग चमकला
06:50 AM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा समभाग मंगळवारी तेजीत असताना दिसला. तिसऱ्या तिमाहीचा दमदार निकाल समभागाला तेजी देण्यात हातभार लावणारा ठरला. समभाग 680 रुपयांच्या बंद भावावरुन सकाळी 684 रुपयांवर खुला झाला होता. यानंतर तो 700 रुपयांवरही पोहचला. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 390 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षी समान अवधीत 326 कोटी रुपये होता. 3 महिन्यात कंपनीचा समभाग 16 टक्के इतका वाढला आहे.
Advertisement
Advertisement