आयसीआयसीआय प्रुडेंशियल :1.2 दिवसांत 99 टक्के दावे निकाली
06:29 AM Dec 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी 99.04 टक्के क्लेम सेटलमेंट रेशो घोषित केला आहे, जो उद्योगातील सर्वोच्च आहे. विशेष म्हणजे, मृत्यूचा दावा निकाली काढण्याचा सरासरी कालावधी केवळ 1.2 दिवस होता.
अमीश बँकर, चीफ ऑपरेशन्स ऑफिसर, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स म्हणाले, दावा हा सत्याचा अंतिम क्षण असतो आणि आम्ही प्रत्येक दावा अत्यंत संवेदनशीलतेने हाताळतो. आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये, आमचा क्लेम सेटलमेंट रेशो 99.04 टक्के होता. याशिवाय, आम्ही याच कालावधीत एकूण 451 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे मृत्यूचे दावे निकाली काढले. आमच्या ‘क्लेम फॉर शुअर’ उपक्रमांतर्गत आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आम्ही 71.24 कोटी रुपयांचे मृत्यू दावे निकाली काढले आहेत.
Advertisement
Advertisement