‘आयसीआयसीआय’ इन्शुरन्सने 3 लाख कोटींचा टप्पा
वृत्तसंस्था /मुंबई
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने, व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेमध्ये (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) 3 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 31 जुलै 2024 पर्यंत कंपनीचे अॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) 3.14 लाख कोटी इतके होते. अनुप बागची, एमडी आणि सीईओ, म्हणाले, “व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तांमध्ये 3 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. हे आमच्या उत्पादनांना असलेली ग्राहकांची पसंती आणि त्यांना त्यांची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करण्यासाठी त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास प्रतिबिंबित करते. उत्पादने आणि प्रक्रिया सुलभ करण्याचा आमचा दृष्टीकोन आमच्या व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेमध्ये वाढ घडवून आणणारा एक घटक आहे. ग्राहक स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी आमच्यावर अवलंबून असतात. म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांच्या बचतीचे विश्वस्त आणि संरक्षक म्हणून काम करतो आणि आम्ही एक गुंतवणुकीचे कठोर तत्वज्ञान आणि रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क स्थापित केले आहे.
या दृष्टिकोनामुळे कंपनीच्या स्थापनेपासून आणि बाजारपेठेतील चक्रात आमच्याकडे कोणतीही नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता नाही याची खात्री झाली आहे. श्री. बागची पुढे म्हणाले, “आमचा विश्वास आहे की, जीवन विमा समाजाच्या आर्थिक सुरक्षा, संपत्ती निर्माण आणि सेवानिवृत्ती उत्पन्नाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करतो, म्हणून आमची उत्पादने आणि प्रक्रिया या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केल्या आहेत. लागू करण्यात आलेल्या तंत्रज्ञान उपायांमुळे आम्हाला जीवन विमा सुलभ करण्यात, नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यात आणि ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी योग्य चॅनेलद्वारे योग्य ग्राहकांना योग्य उत्पादन योग्य किंमतीत उपलब्ध करून देण्यात मदत झाली आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची आमची वचनबद्धता केवळ 1.27 दिवसांच्या टर्नअराउंड वेळेसह, आथिर्क वर्ष 2024 मधील आमच्या क्लेम सेटलमेंट रेशो 99.17ज्ञ् मध्ये दिसून येते.“