Ichalkaranji Municipal : इचलकरंजीत हायव्होल्टेज ड्रामा! आयुक्त आणि महिला ठेकेदारात वादावाद
इचलकरंजी पालिकेत खळबळ!
इचलकरंजी : येथील महापालिकेत मंगळवारी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याशी एका महिला ठेकेदारांनी जोरदार हुज्जत घातली. याचवेळी पालिकेच्या कामकाजाबाबत या महिलेने केलेल्या आरोपावरून पालिकेत याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली नसल्याच्या कारणातून हा प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संबंधित महिला ही गेली अनेक वर्षे इचलकरंजी नगरपालिकेत मक्तेदार म्हणून काम करते. त्यांच्याकडे शहरातील एका चौकाचे काम सुरू आहे या कामाबाबत कागदपत्रे घेऊन संबंधित मक्तेदार महिला बांधकाम खात्यातील एका अभियंताकडे गेली होती. परंतु
या अभियंताने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. या कारणावरून संबंधित महिला अधिकाऱ्यांबरोबर जोरदार बाद घालत होत्या. याची आयुक्त पल्लवी पाटील या आपल्या कार्यालयाकडे जात होत्या. पालिकेत सुरू असलेला आरडाओरडा पाहून त्या घटनेच्या ठिकाणी गेल्या. यावेळी संबंधित मक्तेदार महिलेने आयुक्त पल्लवी पाटील यांच्याशी जोरदार वादावादी केली.
आयुक्त पाटील यांनीही त्यांना खड्या आवाजात सुनावले. संबंधित मक्तेदार महिलेस कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या वादावादीत शहराच्या लोकप्रतिनिधीचेही नाव आले. या सर्व प्रकारामुळे पालिकेत काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.