कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इचलकरंजीच्या युवकाचा अपहरण करून निर्घृण खून

06:22 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ इचलकरंजी, निपाणी

Advertisement

इचलकरंजी-भोनेमाळ येथील युवकाचा दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्याने अपहरण करून निर्घृणपणे खून केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुहास सतीश थोरात (वय 19, रा. भोनेमाळ) या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कागल तालुक्यातील अर्जुननगर येथील एका महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या ओढ्यात टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

Advertisement

या गुह्यात सहभागी असलेल्या संशयित ओंकार अमर शिंदे (वय 25), ओंकार रमेश कुंभार (वय 21, दोघे रा. लिगाडे मळा) यांना पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेत बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली.  मयत सुहास थोरात इलेक्ट्रिक दुचाकी विक्री दुकानात नोकरीला होता. शुक्रवारी दुपारी संशयितांनी दुचाकी दुरुस्तीचा बहाणा करत सुहासला मोपेडवरून सोबत नेले. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. दरम्यान, पूर्वीच्या वादाच्या अनुषंगाने मुलाच्या जीवाला धोका असल्याचा संशय बळावल्याने वडील सतीश थोरात यांनी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत फिर्याद नोंदवली. यानंतर पोलिसांनी सुहासचे अपहरण करणाऱ्या तिघा संशयितांचा शोध घेत अवघ्या काही तासांतच इचलकरंजी व चंदूर येथून रात्रीच त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयितांनी सुहासचा खून केल्याची कबुली दिली.

सुहास थोरात याला संशयितांनी कागल तालुक्यातील देवचंद महाविद्यालयाच्या पिछाडीस नेऊन तेथे कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात, हातावर, तोंडावर वार केले. सात ते आठपेक्षा अधिक घाव वर्मी बसल्याने सुहास याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह संशयितांनी महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या ओढ्यात टाकल्याचे सांगितले.

दरम्यान, मुरगुड पोलिसांना ओढ्यात अनोळखी मृतदेह सापडल्याचे समजल्यानंतर सुहास याची ओळख पटली. मुरगूड येथेच शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी खून आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद सुहासचे वडील सतीश बळीराम थोरात (वय 50) यांनी दिली आहे. सुहास आणि एक अल्पवयीन संशयित यांच्यात वर्षभरापूर्वी वाद झाला होता. त्यातून सूडबुद्धीने हा खून झाल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे. तर एकाच मोपेडवरुन चौघेजण गेल्याचे समोर आले आहे.

ओंकार शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार

अटक केलेल्या संशयित आरोपींपैकी ओंकार शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर अल्पवयीन संशयित हा शाळकरी मुलगा असून तो दहावीत शिकत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश दिसत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article