Ichalkaranji News: इचलकरंजीतील IGM बालरुग्णालयात शॉर्टसर्किट, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित
04:42 PM Aug 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
घटनेवेळी बालरुग्णविभागात 21 बालरुग्ण उपचार घेत होते
इचलकरंजी: येथील आयजीएम रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागात शनिवारी दुपारी बाथरूममध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. या घटनेमुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र सुरक्षारक्षक शुभम पाटील यांच्या प्रसंगावधानामुळे आणि रुग्णालय प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मात्र सुरक्षारक्षक शुभम पाटील यांच्या प्रसंगावधानामुळे आणि रुग्णालय प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी बालरुग्णविभागात 21 बालरुग्ण उपचार घेत होते. त्यांच्यासोबत नातेवाईकही उपस्थित होते. अचानक बाथरूममध्ये आगीच्या ठिणग्या दिसताच सुरक्षारक्षक पाटील यांनी त्वरित अग्निरोधक सिलेंडरचा वापरकरून आग नियंत्रणात आणली. त्याचवेळी प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्व बालरुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये सुरक्षित हलवले. मात्र, या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल आवाडे यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रुग्णालयाच्या स्लॅबमधील गळती त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश दिले तसेच फायर ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना आणि निधीबाबत चर्चा केली.
प्रथमदर्शनी ही घटना रुग्णालयाच्या स्लॅबमधून होणाऱ्या पाणीगळतीमुळे वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होवून आग लागली असण्याची शक्यता आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास कळवून गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच संपूर्ण वायरिंगची तपासणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
- डॉ. भाग्यरेखा पाटील
वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम
रुग्णालय.
वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम
रुग्णालय.
Advertisement
Advertisement