आयसीसीकडून कॅनडाचे सदस्यत्व रद्द
वृत्तसंस्था, कतार
कॅनडा क्रिकेट संघटनेच्या नियंत्रण समितीमध्ये आर्थिक भ्रष्टाचार झाल्याने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून त्याच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान आयसीसीने कॅनडाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कॅनडाचा राष्ट्रीय संघ सहभागी होवू शकतो, असे सांगण्यात आले आहे.
गेल्या एप्रिलमध्ये कॅनडाच्या प्रसारण कार्पोरेशनकडून क्रिकेट कॅनडाच्या नियंत्रण मंडळामध्ये आर्थिक भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या भ्रष्टाचारामध्ये कॅनडा क्रिकेट मंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि क्रिकेटपटूंचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. मॅचफिक्स्ंिाग आणि हिंसाचार माजविण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. आता लवकरच या प्रकरणाच्या भ्रष्टाचार विरोधी चौकशी समितीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. पण आयसीसीने क्रिकेट कॅनडाचे सदस्यत्व रद्द केले आहे.