महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयसी 814’ पुन्हा अडचणीत

06:28 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एएनआयने घेतली न्यायालयात धाव

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कंधार विमान अपहरणावर आधारित वेबसीरिज ‘आयसी 814’ आता नव्या कायदेशीर संकटात सापडली आहे. वृत्तसंस्था एएनआयने नेटफ्लिक्स आणि आयसी 814 च्या निर्मात्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कॉपी राइट आणि ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप करत वृत्तसंस्थेने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

सीरिजमध्ये वृत्तसंस्थेच्या फुटेजचा अनुमतीशिवाय वापर करण्यात आला आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, जनरल परवेज मुशर्रफ आणि दहशतवादी मसूद अझहरला दाखवितानाच्या वृत्तसंस्थेच्या फुटेजचा वापर अनुमतीशिवाय करण्यात आल्याचा आरोप आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्स अणि वेबसीरिजच्या निर्मात्यांना नोटीस जारी करत स्पष्टीकरण मागविले आहे. या प्रकरणी आता शुक्रवारी सुनावणी होणरा आहे. आयसी 814 सीरिजवरून यापूर्वीही वाद झाला आहे. दहशतवाद्यांची खरी ओळख लपविणे आणि त्याऐवजी हिंदू नावांचा वापर करण्यात आल्याप्रकरणी केंद्र सरकारने नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडला समन्स पाचारण केले होते. यानंतर सीरिजमध्ये दहशतवाद्यांची खरी नावे नमूद करण्यात आली आहेत.

ही वेबसीरिज 1999 मध्ये काठमांडू येथून अपहरण करण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला कंधार येथे नेण्याच्या आणि तेथे प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांची मुक्तता करण्याच्या घटनेवर आधारित आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article