इब्राहिम झेद्रान अफगाणचा नवा कर्णधार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अफगाणचा क्रेकेट संघ सप्टेंबर महिन्यात भारातच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ते भारताबरोबर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अफगाण क्रिकेट मंडळाने सोमवारी इब्राहीम झेद्रानची संघाच्या कर्णधारपदी घोषणा केली आहे.
भारत आणि अफगाण यांच्यातील ही तीन सामन्यांची टी-20 मालिका दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानावर खेळविली जाणार आहे. सदर मालिका 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या अफगाण संघामध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज नवीन उल हकचे पुनरागमन झाले आहे. नवीन उल हकला उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला विंडीजविरुद्धच्या मालिकेत तसेच 2026 च्या आयसीसी टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत खेळता आले नव्हते. या मालिकेसाठी अफगाणने पूर्ण ताकदीचा आणि अनुभवी संघ निवडला आहे. फजल हक फरुकी, अब्दुल्ला अहमदझाई आणि अष्टपैलु अझमतुल्ला ओमरझाई यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलु गुलबदीन नईबचे संघात पुनरागमन झाले आहे. रशीद खान, नूर अहमद, तसेच खरोटी हे या संघातील फिरकी गोलंदाज आहेत. अष्टपैलु मोहम्मद नबीच्या समावेशामुळे अफगाणचा संघ या दौऱ्यासाठी समतोल झाला आहे.
अफगाण संघ: इब्राहीम झेद्रान (कर्णधारम), गुरबाज, नूर रेहमान, एस. अटल, रसोली, ओमरझाई, नईब, रशिद खान, खरोटी, नूर अहमद, मुजीब उर रेहमान, फरुकी, अहमद झाई, नवीन उल हक.
वेळापत्रक - पहिला सामना 13 सप्टेंबर
दुसरा सामन्या 15 सप्टेंबर
तिसरा सामना 17 सप्टेंबर