For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

हवाराच्या पंजाबमधील तुरुंगबदलीला आयबीचा विरोध

06:01 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
हवाराच्या पंजाबमधील तुरुंगबदलीला आयबीचा विरोध
IB opposes Hawara’s transfer to a Punjab prison
Advertisement

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्येतील दोषी आणि बब्बर खालसा या प्रतिबंधित संघटनेचा सदस्य जगतार सिंह हवारा याला दिल्लीतील तिहार तुरुंगातून पंजाबमधील तुरुंगात हलवण्याच्या मागणीला इंटेलिजेन्स ब्युरोने (आयबी) विरोध केला आहे. हवारा हा उच्च जोखमीचा कैदी असल्याचे सांगत, त्याच्या स्थानांतराचा आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा आयबीने सर्वोच्च न्यायालयात दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. आयबीचा अहवाल गंभीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले. हवारा यांच्या वतीने वरिष्ठ वकील एस. मुरलीधर यांनी निवडणुकीची चिंता असल्यास सुनावणी तीन महिन्यांनी घेण्याची सूचना केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी पुढील वषी फेब्रुवारीत ठेवली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हवारा यांच्या याचिकेवर आयबीचे मत घेण्याचे निर्देश दिल्ली सरकारला दिले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.