For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शिवशक्ती’ नामकरणाला आयएयूची मंजुरी

06:18 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘शिवशक्ती’ नामकरणाला आयएयूची मंजुरी
Advertisement

चांद्रयान-3 चे लँडिंग स्थळ :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ नाव देण्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या सुमारे 7 महिन्यांनी इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल युनियनने (आयएयू) आता या नावाला मंजुरी दिली आहे. गॅझेटियर ऑफ प्लॅनेटरी नोमेनक्लेचरनुसार आयएयू वर्किंग ग्रूप ऑफ प्लॅनेटरी सिस्टीम नोमेनक्लेचरने चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरच्या लँडिंग स्थळासाठी शिवशक्ती नावाला मंजुरी दिली आहे.

Advertisement

विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर ऐतिहासिक लँडिंग केल्याच्या तीन दिवसांनी पंतप्रधान मोदींनी बेंगळूर येथील इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमध्ये शिवशक्ती नावाची घोषणा केली होती. शिवमध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्ती आम्हाला संबंधित संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती पॉइंट हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या एकात्मतेची जाणीव करून देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते.

चांद्रयान-3 मधील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रूवानजीक एका ठिकाणी मार्करच्या स्वरुपात काम करण्यास सुरुवात केली होती. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगच्या 15 वर्षांपूर्वी भारताच्या चांद्रयान-1 ने 14 नोव्हेंबर 2008 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर प्रभाव पाडला होता. या प्रभावस्थळाला जवाहर पॉइंट म्हटले जाते. चांद्रयान-2 ने ज्या पॉइंटवर स्वत:च्या खुणा उमटविल्या होत्या, त्याला आता तिरंगा संबोधिण्यात येणार आहे. भारताकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रयत्नासाठी हा पॉइंट प्रेरणेच्या स्वरुपात काम करणार आहे. तसेच अपयशाला अंत नसल्याची आठवण करून देत राहणार असल्याचे मोदींनी म्हटले होते.

Advertisement
Tags :

.