For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन!

10:48 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन
Advertisement

भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांचे आश्वासन

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन. मी देखील केएलई संस्थेचा विद्यार्थी असून बेळगावशी माझे अतुट नाते आहे. मी बाहेरील असल्याचे समजू नका. मलाही संधी द्या. बेळगावसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. बेळगावला आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित करण्यात येईल. रेल्वे आणि विमानतळांचा दर्जा वाढविण्यात येईल, असे आश्वासन बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी दिले. शुक्रवारी केएलईच्या जेएनएमसीच्या आवारात त्यांनी कर्मचारी व लिंगराज महाविद्यालय आवारात कर्मचाऱ्यांची भेट घेऊन जगदीश शेट्टर यांनी मतयाचना केली. याप्रसंगी केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी भारताकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याची कामगिरी केली आहे. त्यांचे धाडसी निर्णय व प्रमुख योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल झाला आहे. भारताला जगातील प्रमुख देशांमध्ये स्थान मिळाले आहे. मोदींच्या प्रशासकीय कार्यकाळात बेळगावमधून जगदीश शेट्टरना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे, असे डॉ. कोरे यांनी सांगितले. केएलईने 100 वर्षांच्या कालावधीत अनेक राजकारण्यांना मोठे केले आहे. संस्थेच्या ‘सप्तर्षिं’नीदेखील शिक्षक मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते. आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी म्हणून जगदीश शेट्टर यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविताना संस्था, राज्यासाठी अमूल्य योगदान दिले. बेळगावच्या विकासासाठी ते अनेक दशकांपासून काम करत आले आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजप बहुमतासह पुन्हा सत्तेवर येईल, यात शंका नाही. आपले मत योग्य व्यक्तीसाठी द्यावे, असे सांगून त्यांनी शेट्टर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. याप्रसंगी केएलईचे संचालक, विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, केएलईचे सचिव डॉ. बी. जी. देसाई उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.