For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तेसाठी नव्हे, लोकांसाठी परतणार!

07:00 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सत्तेसाठी नव्हे  लोकांसाठी परतणार
Advertisement

बांगलादेशात परतणार शेख हसीना : कायमस्वरुपी विदेशात राहू शकणार नाही

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबरपर्यंत मायदेशी परतणार असल्याचा पुनरुच्चार केला. माझ्या वापसीचा उद्देश सत्ताप्राप्ती करणे नव्हे तर बांगलादेशच्या लोकांसोबत उभे ठाकणे आहे. कुठल्या तारखेला आणि कोणत्या प्रकारे बांगलादेशा परतणार याची माहिती योग्यवेळी देणार असल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे. बांगलादेशात परतण्याचा निर्णय माझा आहे. माझा निर्णय पक्षामध्ये राजकीय चर्चेचा विषय आहे. ढाका येथील बांगलादेश सरकारसोबत माझी कुठलीच राजकीय तडजोड झालेली नाही.

Advertisement

अवामी लीगवर बंदी घालणाऱ्या अन् पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात हजारो गुन्हे नोंद करणाऱ्या लोकांसोबत कुठल्याही प्रकारच्या गुप्त तडजोडीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे. बांगलादेश सरकारकडून प्रत्यार्पणाच्या मुद्द्याचा राजकीय हेतूसाठी वापर केला जात आहे. मी स्वत:च मायदेशी परतू इच्छित आहे आणि वर्तमान पंतप्रधान तारिक रहमान हे माझ्या वापसीवर आक्षेप का घेत आहेत हेच मला समजत नाही. मी माझ्या देशातच परतणार आहे. मी पूर्ण आयुष्य विदेशात राहू शकते का? स्वत:चा देश आणि माझ्या लोकांकडे मला परतावेच लागेल असे वक्तव्य शेख हसीना यांनी केले आहे.

भारत-बांगलादेश संबंध

भारत आणि बांगलादेशमधील संबंध केवळ काही वक्तव्यांमुळे खराब होणार नाहीत. लोकशाही संपुष्टात येणे, कट्टरवादाला बळ मिळणे, अल्पसंख्याकांवरील अत्याचार, क्षेत्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणे आणि राजकीय सूडासाठी सरकारी संस्थांचा वापर यासारख्या स्थिती दोन्ही देशांच्या संबंधांना प्रभावित करतात असा दावा शेख हसीना यांनी केला आहे.

राजकीय संकट

बांगलादेशात राजकीय संकट अनिश्चित काळापर्यंत जारी राहू शकत नसल्यानेच मी डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार आहे. तेथील वर्तमान स्थितीमुळे आर्थिक प्रगती प्रभावित होत असून दारिद्र्याचे प्रमाण वाढत आहे. बांगलादेशातील सद्यस्थिती केवळ अवामी लीगचा मुद्दा नाही, तर हे राष्ट्रीय संकट आहे. विकास रखडतो तेव्हा रोजगार संपुष्टात येतात आणि कायदा-सुव्यवस्था कमकुवत होऊ लागताच लोकांची सुरक्षा प्रभावित होते असे हसीना म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.