सामान्य कार्यकर्ता म्हणूनच राहीन!
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे हताश वक्तव्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद, विविध नेत्यांचे विधान, हायकमांडच्या अलिप्तपणात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अलिप्ततेचे शब्द उच्चारले आहेत. मी कोणालाही त्रास देणार नाहीत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच राहीन, असे स्पष्ट केले आहेत.
दिल्लीतील कर्नाटक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, मी मंगळवारपासून दिल्लीत आहे. मी वरिष्ठांचीही भेट घेतलेली नाही. राहुल गांधी मंगळवारी परदेशातून आले होते. मी आता त्यांना त्रास देणार नाही. मला एक सामान्य पक्ष कार्यकर्ता म्हणून राहण्याची इच्छा आहे. मी कोणालाही त्रास देऊ इच्छित नाही. हायकमांडने आम्हाला मुक्त स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही सर्वजण एकत्र राहून राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करू, असे आश्चर्यकारर वक्तव्य डी. के. शिवकुमार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्तावाटपाचा प्रश्न हायकमांड सोडवेल, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर अलिप्ततेचे शब्द उच्चारताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी, राहुल गांधींना त्रास देऊ इच्छित नाही. मुख्यमंत्री बदलाबाबत कोणत्याही अफवा नाहीत. मुख्यमंत्र्यांसोबत माझी नाश्त्याची बैठक ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मी सर्वांसोबत नाश्त्याची बैठक घेतो. शेअरिंग, काळजी घेणे हे अगदी सामान्य आहे, असे शिवकुमार म्हणाले.
हायकमांडला भेटण्यासाठी डीकेंचा संघर्ष
नेतृत्व बदलाच्या बाबतीत हायकमांड नेत्यांच्या हस्तक्षेपासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्ली पातळीवर जोरदार लॉबिंग करत आहेत. दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना भेटण्यासाठी सतावत असल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असलेले डी. के. शिवकुमार यांना हायकमांड नेत्यांना भेटण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटाने राज्यात आयोजित करत असलेल्या अहिंद मेळाव्याला आळा घालण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.