For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मी पालकमंत्री असेपर्यंत मायनिंग होऊ देणार नाही !

03:52 PM Jun 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मी पालकमंत्री असेपर्यंत मायनिंग होऊ देणार नाही
Advertisement

मंत्री नितेश राणेंचा आजगाव वेतोबा मंदिरात ग्रामस्थांना विश्वास

Advertisement

वेंगुर्ले ।प्रतिनिधी

आजगाव दशक्रोशीत मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही. पालकमंत्री या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून फक्त पर्यावरणपूरक प्रकल्प आणले जातील. ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आजगाव येथील वेतोबा मंदिरात ग्रामस्थांना दिली. मायनिंग विरोधी संघर्षामुळे आजगाव दशक्रोशीत निर्माण झालेला तणाव नष्ट करण्यासाठी त्यांनी शुक्रवारी दुपारी आजगावातील वेतोबा मंदिरात उपस्थित राहून ग्रामस्थ व आंदोलकांशी संवाद साधला. जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत कोणताही विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही असे सांगत त्यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार देवासमोर नारळ ठेऊन मायनिंग होऊ देणार नसल्याचा विश्वास ग्रामस्थांना दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.