For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेच्या आशीर्वादाने मी दिल्लीत जाणारच - खा.राऊत

05:31 PM Apr 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
जनतेच्या आशीर्वादाने मी दिल्लीत जाणारच   खा राऊत
Advertisement

श्री देव पाटेकराचे दर्शन घेत प्रचाराचा फोडला नारळ! 

Advertisement

सावंतवाडी

पक्ष बदलूपणा आणि खाल्ल्या ताटात घाण करणारे, तसेच सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी लाचार बनणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत. त्यांच्याबद्दल जनताच आता बोलत आहे .त्यामुळे मी अधिक काय बोलणार त्यामुळे ४ जूनला देव कोणाला पावणार हे या भागातील जनताच त्यांना उत्तर देणार आहे. निश्चितपणे सर्व देव आणि जनता माझ्या पाठीशी आहे .आणि निश्चितपणे मी जवळपास अडीच लाखाच्या मताधिक्क्याने या भागातून खासदार म्हणून दिल्लीत जाणारच असे यावेळी विनायक राऊत यांनी बोलताना सांगितले. सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन श्री देव पाटेश्वर देवस्थानला नतमस्तक होत श्री राऊत यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी श्री राऊत यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत मी तुमच्यातलाच आहे आणि मी तुमच्यातलाच राहणार आहे. फक्त तुम्ही मला जशी पूर्वी साथ दिली तशी आताही साथ द्या .तुमच्या हक्काचा खासदार म्हणून आपण आहे  हे लक्षात ठेवा असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रचाराचा शुभारंभ करताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,  माजी नगराध्यक्ष, काँग्रेसचे नेते ऍड. दिलीप नार्वेकर यांनी खासदार साहेब आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत तुम्ही या भागातून बिनधास्त रहा तुम्हाला सर्वाधिक मताधिक्य मिळणारच असा विश्वासही दिला. या विश्वासामुळेच मी निश्चितपणे दिल्लीत तिसऱ्यांदा जाणारच याला कुणी आणखी भाकीत करायची गरज नाही असेही राऊत म्हणाले .यावेळी श्री राऊत यांनी प्रचाराचा शुभारंभ शनिवारी दुपारी तीन वाजता सावंतवाडी संस्थांनच्या राजघराण्यात भेट देत श्री देव पाटेश्वर देवस्थानचे दर्शन घेत  श्रीफळ वाढवून केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले , राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या अर्चना घारे परब,  ऍड दिलीप नार्वेकर ,बाळा गावडे ,रुपेश राऊळ , अरुण दुधवडकर , रुची राऊत ,पुंडलिक दळवी , समीर वंजारी  साक्षी वंजारी,  ऍड.सायली दुभाषी , बाबल्या दुभाषी , राकेश नेवगी, सावली पाटकर, देवेंद्र टेमकर ,समीरा खालील ,श्रुती दळवी ,सागर नानोसकर,आबा सावंत ,  अफरोज राजगुरू,   उमेश कोरगावकर आधी उपस्थित होते. श्री राऊत यांनी महायुतीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा नारळ आज फोडला. यावेळी सावंतवाडी शहरातून सायंकाळी उशिरा भव्य रॅली ही काढण्यात येणार आहे. काँग्रेस आरपीआय या प्रमुख पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी श्री राऊत यांनी भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सावंतवाडी संस्थांनच्या  श्री देव पाटेश्वर देवस्थानला नतमस्तक होत त्यांनी सावंतवाडी शहरातील अनेक व्यापारी नागरिक यांच्या गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतला.

Advertisement

Advertisement
Tags :

.