For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मी ईश्वर-अल्लाहची शपथ घेते की....

06:07 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मी ईश्वर अल्लाहची शपथ घेते की
Advertisement

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवरून ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी भाजपवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उद्घाटनाद्वारे भाजप नौटंकी करत असल्याची टीका ममतांनी केली आहे.

Advertisement

मला राम मंदिरावरून विचारणा होत आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या उत्सवावर मी विश्वास ठेवतो. भाजपला जे करायचे आहे ते त्याने करावे, भाजप निवडणुकीपूर्वी ड्रामा करत असून याबद्दल मला कुठलीच समस्य नाही, परंतु इतर समुदायाच्या लोकांची अवहेलना करणे योग्य नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

मी ईश्वर अल्लाहची शपथ घेऊन सांगते की जोपर्यंत मी जिवंत असेन तोपर्यंत कधीच हिंदू-मुस्लीम असा भेदभाव करणार नाही. लोकांना धार्मिक आधारावर विभागणे मला मान्य नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनाही 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. परंतु बॅनर्जी या सोहळ्यात सामील होणार नसल्याचे समोर आले आहे.

ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसचा अन्य कुठलाही प्रतिनिधी अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनसोहळ्यात सामील होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही राजकारणाला धर्मासोबत जोडण्यावर विश्वास ठेवत नसल्याचे तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सामील होणार आहेत. याचबरोबर जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.