कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

20 वर्षांपासून फळे-भाज्यांची चाखली नाही चव

06:46 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एक तुकडा देखील घेऊ शकतो जीव

Advertisement

एका महिलेने 20 वर्षांपासून हिरव्या भाज्या खाल्ल्या नाहीत आणि तसेच ताज्या फळाची चवही चाखली नाही. कारण तिने जर असे केले तर तिच्यासाठी हे जीवघेणे ठरू शकते. वेस्ट मिडलँड्स येथील 27 वर्षीय क्लोरा रईसबेकला ओरल एलर्जी सिंड्रोम आहे. पॉलिनेशनद्वारे निर्माण झालेल्या कुठल्याही गोष्टीपासुन तिला भयंकर अॅलर्जी आहे.

Advertisement

फळे आणि भाज्यांचा एक घास देखील माझा जीव घेऊ शकतो असे क्लोईचे सांगणे आहे. जानेवारी 2005 मध्ये तिचे वय 7 वर्षे असताना ओरल अॅलर्जी सिंड्रोम (ओएएस)चे निदान झाले होते. तेव्हा तिला काहीतरी गडबड असल्याची जाणीव पहिल्यांदा झाली होती. शाळेत फळे खाल्ल्याने तिचे ओठ सुजले होते आणि गळ्यात खाज सुटू लागली होती, तेव तिने शाळेतील नर्सची मदत मागितली होती, परंतु तेव्हा तिच्या या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते.

वयाच्या 7 व्या वर्षी दिसली लक्षणं

त्याच आठवड्यात तिने एक सफरचंद खाल्ले आणि तेव्हा तिच्यात वेदनादायी लक्षणे दिसू लाली. हे एक एनाफाइलॅक्टिक शॉक होता, तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले, जेथे रक्त परीक्षणातून तिला अॅलर्जी असल्याची पुष्टी झाली. मग तिला अॅलर्जी तज्ञांकडे पाठविण्यात आले, ज्याने त्वचा परीक्षणानंतर खाद्यपदार्थांद्वारे होणाऱ्या प्रतिक्रियांची पूर्ण सूची समोर आल्यावर तिला ओएएस पीडित ठरविले.

15 प्रकारची फळे, भाज्यांपासून अॅलर्जी

क्लोईला आता 15 विविधफ ळे, भाज्यांपासून अॅलर्जी आहे, यात केळी, गाजर, बदाम, शिमला मिर्ची सामील आहे. तिने 20 वर्षांपासून या सर्व गोष्टी खाणे टाळले आहे. आता क्लोईमध्ये ‘खाण्याची भीती’ निर्माण झाली असून आता ती प्रतिदिन पुरेसे पोषक घटक प्राप्त करण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंटवर निर्भर राहते आणि एनाफाइलॅक्टिक शॉकच्या स्थितीत ती प्रत्येक ठिकाणी एक एपिपेन सोबत बाळगते.

ओठ सुजणे, तोंडात फोड येणे

माझी अॅलर्जी अचानक सुरू झाली, मी कुठल्याही लक्षणाशिवाय सामान्य स्वरुपात फळे आणि भाज्या खाऊ शकत होते, परंतु त्या एका फळाचा घास घेतल्यावर अन्नासोबतचे माझे नातेच बदलले. मी दिवसा 5 वेळा खाल्ले तर माझे ओठ सुजू लागतात, गळ्यात खाज सुटू लागते आणि तोंडात फोड येतात. यामुळे माझे खाणे-पिणे अत्यंत अवघड ठरले आहे आणि मला स्वत:च्या अॅलर्जीच्या उपचारासाठी दरदिनी मल्टिव्हिटॅमिन घेण्यावर निर्भर रहावे लागेल, 7 वर्षांच्या वयापूर्वी मी फळे आणि भाज्या कुठल्याही त्रासाशिवाय खात होते असे क्लोई सांगते.

20 वर्षांपासून हिरव्या भाज्यांपासून दूर

काही फळे आणि भाज्यांना क्लोईने कधीच खाल्लले नाही, कारण ती प्रतिक्रियेबाबत खूपच घाबरते, ज्यात स्ट्रॉबेरी, आंबा आणि ब्ल्यूबेरी सामील आहे. मागील 20 वर्षांमध्ये एकही हिरवी भाजी मी खाल्ली नसल्याचे तिने सांगितले आहे.

स्वत:चे अन्न नेण्याचा प्रकार

क्लोई अनेकदा सामाजिक कार्यक्रमांमध्ये स्वत:सोबत स्वत:चे अन्न घेऊन जाते, जेणेकरून चुकूनही फळे आणि भाज्या खाव्या लागू नयेत. तसेच ती स्वत:च्या प्रियकरालाही अनेक प्रकारची काळजी घेण्यास सांगत असते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article