For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लुथरांना पळण्यास मदत केलेल्याचे माझ्याकडे पुरावे’

01:17 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘लुथरांना पळण्यास मदत केलेल्याचे माझ्याकडे पुरावे’
Advertisement

लुथरा ‘बुराटे’ खरा मालक राजकर्त्याचा नातलग : आमदार विजय सरदेसाई यांचा सरकारवर घणाघात

Advertisement

पणजी : हडफडे येथील बर्च क्लबचे तथाकथित मालक लुथरा बंधू यांना देशातून पळून जाण्यास कुणी मदत केली त्याचे आपणाकडे पुरावे आहेत, असे सांगताना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी लुथरा बंधू म्हणजे ‘बुराटे’ आहेत, क्लबचा खरा मालक एका बड्या राजकर्त्याचा नातलग असून तो सुरक्षित आहे, असा दावा केला आहे. या अग्नितांडवाला सर्वस्वी गोवा सरकार जबाबदार असून आता ज्या पद्धतीने त्या भग्नावशेषांची पाडापाडी चालली आहे ते केवळ लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

 डबल नव्हे, फोर इंजिनचे सरकार

Advertisement

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हे सरकार डबल इंजिनचे नसून फोर इंजिन सरकार आहे. हडफडेचा स्थानिक आमदार त्यांचाच, हडफडे पंचायत त्यांचीच, केंद्रातील सरकार त्यांचेच आणि राज्यातील सरकारही त्यांचेच असे असताना थेट एका मीठागरात बेकायदेशीररित्या बांधकाम करून एवढा मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाईटक्लब सुरू करण्यास मान्यता कुणी व कशी दिली? त्याही पलिकडे जाताना तेथे बारगर्ल्सना नाचण्याची परवानगी कुणी दिली?, असा सवाल केला.

जनतेच्या डोळ्यांना पाणी लावतात 

या सर्वांवर कहर म्हणजे ‘टाईम्स’ कडून अशा बेकायदेशीर आस्थापनाला ‘मोंस्ट प्रेस्टिजीअस रेस्टोबार क्लब’ म्हणून पुरस्कार देण्यात येतो, त्यातून त्याची जगभरात वाहवा होते आणि गोवा सरकार उघड्या डोळ्यांनी हे प्रकार पाहत बसते, हा एकूण प्रकारच अनाकलनीय व तेवढाच निंदनीय आहे, असे सरदेसाई म्हणाले.

इतर आस्थापनांवर बुलडोझर फिरवून दाखवा

बर्च नाईटक्लबला आग लागल्यानंतर आता ज्या प्रकारे सरकारने कारवाईची जंत्रीच आरंभली आहे तो केवळ दिखावा आहे. या सरकारला धमक असेल तर याच मालकाकडून याच भागात चालविण्यात येणाऱ्या व सदर घटना घडल्यानंतर आजही बिनदिक्कतपणे चालणाऱ्या आस्थापनांवर बुलडोझर फिरवून दाखवावा, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले.

Advertisement
Tags :

.