For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिकीट आहे, पण डबाच नाही

06:26 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिकीट आहे  पण डबाच नाही
Advertisement

ओडीशा या राज्यातील ही एक आश्चर्यकारक घटना आहे. या राज्यातील संबलपूर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्रातील नांदेड येथे जाणारी ट्रेन आली. प्रवाशांनी त्यांचे डबे शोधून त्यांच्यात बसण्यास प्रारंभ केला. तथापि, या गाडीला एसी डबा लावण्यात आला नव्हता. या डब्यातील 57 तिकिटे खपली होती. प्रवाशांनी ती विकत घेतली होती. तिकिटावर कोच  क्रमांका आणि आसन क्रमांकही नोंद केलेला होता. तथापि, रेल्वेत हा डबाच नव्हता. त्यामुळे प्रवाशांची आणि तिकिट चेकरची चांगलीच जुंपली. प्रवाशांनी त्यांच्याजवळची वैध तिकिटे दाखवून डब्याची सोय करण्याचा आग्रह धरला. तथापि, तशी सोय करण्याचा अधिकार तिकिट चेकरचा नव्हता. त्यामुळे त्याने नियमावर बोट ठेवून आपली असमर्थता व्यक्त केली. अखेर ट्रेनने प्रवाशांना न घेताच नांदेडकडे प्रयाण केले. या घटनेचा चांगलाच गवगवा झाला. काही प्रवाशांनी रेल्वेकडे तक्रारी सादर केल्या. त्यानंतर रेल्वेने या प्रकरणाची चौकशी करण्यात आला आदेश दिला. त्याप्रमाणे चौकशी होत आहे.

Advertisement

त्या दिवशी या गाडीच्या एसी कोचमध्ये काहीतरी तांत्रिक समस्या उद्भवली होती. त्यामुळे तो डबा गाडीला जोडण्यात आला नव्हता. पण तसे असेश तर प्रवाशांना त्याची आधी कल्पना देणे हे  रल्वेचे उत्तरदायित्व होते. तशी सूचना प्रवाशांना आधी दिली गेली असती, तर त्यांनी आपल्या प्रवासाच्या कार्यक्रमात परिवर्तन केले असते किंवा प्रवास स्थगित केला असता. तथापि, तसा निरोप वेळेवर प्रवाशांना न दिला गेल्याने त्यांची ऐनवेळी मोठीच गडबड उडाली.    ती रेल्वेप्रशासनाला टाळता आली असती, असा सूर उमटत आहे. ही ट्रेन विश्वासपट्टण रेल्वेस्थानकात आल्यानंतर तिला एसी कोच जोडला गेला, अशी माहिती नंतर देण्यात आली होती. तथापि या स्थापनापर्यंतच्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. असा प्रकार रेल्वेच्या इतिहासात प्रथम आहे, असे बोलले जाते.

Advertisement
Advertisement
Tags :

.