For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Nashik | 'मला काहीच सांगायचे नाही'; न्यायाधीशांसमोर हात जोडणारा भोंदू खरात आता एसआयटीच्या ताब्यात

03:33 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
nashik    मला काहीच सांगायचे नाही   न्यायाधीशांसमोर हात जोडणारा भोंदू खरात आता एसआयटीच्या ताब्यात
Advertisement

                 नाशिक एसआयटीच्या कारवाईत अशोक खरात ताब्यात

Advertisement

नाशिक - नाशिकचा भोंदू अशोक खरातला आणि गर्भपाताच्या बलात्कार दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान सुनावणी वेळी न्यायालयाने खरातला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. यावेळी 'मला काहीही सांगायचं नाही, असे म्हणत त्याने न्यायाधीशांसमोर हात जोडले. खरातवर दाखल असलेल्या

एकूण ११ गुन्ह्यांपैकी दिल्लीतील एका पीडित महिलेवरलैंगिक अत्याचार करून बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गुन्हा संवेदनशील आहे. या गुन्ह्यात एसआयटीला खरातची अधिक चौकशी करायची आहे. त्यासाठी सरकारवाडा पोलिसांत दाखल असलेल्या या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीने बुधवारी न्यायालयात अर्ज सादर केला.
त्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

महिलेचा गर्भपात घडवला
खरातने एका महिलेला तू अप्सरा आहेस, असे सांगून भुरळ घातली आणि तिचे लैंगिक शोषण केले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली असता, खरातने तिला अज्ञात गोळ्या आणि जडीबुटीचे औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. हे औषध त्याने कुठून आणले आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा अधिक तपास एसआयटी करत आहे.

 

Advertisement
Tags :

.