Eknath Shine | मी कोणतीही कामं लपून-छपून करत नाही! 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चोख प्रत्युत्तर
साताऱ्याच्या भूमीतून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना आणि माध्यमांना इशारा
सातारा: गेल्या काही तासांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर' आणि उबाठा गटाच्या खासदारांसोबतच्या कथित गुप्त बैठकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मी कोणतीही कामं लपून-छपून करत नाही, माझं सर्व काम उघड असतं," असे म्हणत त्यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
काही प्रसारमाध्यमांनी 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत उबाठा गटाचे काही खासदार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असून त्यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त दिले होते. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
कोणतीही बैठक नाही:
अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. कोणत्याही खासदारासोबत माझी चर्चा झालेली नाही. मी हे सकाळीच स्पष्ट केले आहे," असे शिंदे म्हणाले. लपून काम करण्याची गरज नाही विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, मी कधीही लपून बैठका करत नाही. माझे जे काही राजकारण किंवा समाजकारण आहे, ते जनतेसमोर उघडपणे असते." संसनाटी निर्माण करण्यासाठी चुकीच्या बातम्या देऊ नका, असे आवाहन त्यांनी मीडियाला केले.
"बातमी देण्यापूर्वी त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. केवळ ब्रेकिंग न्यूजसाठी अफवा पसरवू नका," असे खडेबोल त्यांनी सुनावले. या स्पष्टीकरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून रंगलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.