महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अशा जीवनाचा विचारही करू शकत नाही

06:22 AM Jan 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

5 कोटी लोकांपैकी एक आहे ही महिला , डोक्यावर लोखंडाच्या पट्टी

Advertisement

माणूस वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जीवन जगत असतो. जे लोक शरीराने सुदृढ आहेत, ते आपल्याकडे धनदौलत नाही म्हणून व्यथित असतात. परंतु देवाने दिलेले तंदुरुस्त शरीरच सर्वात मोठे धन असल्याचा विचार ते करत नाहीत. जे लोक शरीराने अस्वस्थ असतात, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर आपण स्वत:ला सुदैवी मानू लागतो. एका महिलेचे आयुष्य देखील असेच आहे. या महिलेला इतका दुर्लभ आजार आहे की ती 5 कोटी लोकांपैकी एक ठरली आहे. तिच्या डोक्यात लोखंडी 15 पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. ती ज्याप्रकारचे जीवन जगत आहे त्याचा कुणी विचारही करू शकत नाही.

Advertisement

27 वर्षीय स्टेफनीविषयी अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ती दिव्यांग असून तिला अत्यंत दुर्लभ कंडिशन असल्याने तिचे चालणे-फिरणे जवळपास अशक्य आहे. या कंडिशनचे नाव डुचेन्ने मस्क्युलर डायस्ट्रॉफी (डीएमडी) आहे. ही कंडिशन सर्वसाधारणपणे पुरुषांना असते. तिचे प्रकरण इतके दुर्लभ आहे की ती 5 कोटी लोकांपैकी एक आहे. या कंडिशनमध्ये शरीरात स्नायू काळासोबत कमकुवत होत जातात. वयाच्या तिसऱ्या वर्षीच तिला हा आजार असल्याचे निदान झाले होते.  ती वयाच्या 7 वर्षांपेक्षा अधिक जगू शकणार नसल्याचे तिच्या आईला सांगण्यात आले होते.

महिलेला दुर्लभ आजार

परंतु स्टेफनीने डॉक्टरांचा अनुमान चुकीचा ठरविला आणि त्याहून अधिक जीवन जगून दाखविले. परंतु काळासोबत तिचे शरीर इतके कमकुवत झाले की तिचे कण्याचे हाड एस आकारात वळले आहे. या कंडिशनला स्कोलिओसिस म्हटले जाते. यामुळे तिच्या उजव्या फुफ्फुसावरील दबाव वाढला. यामुळे डॉक्टरांनी स्टेफनीच्या कवटीत 15 पेंच लावण्याचा निर्णय घेतला. हे पेंच धातूच्या एका बँडशी जोडलेले असून त्यांना हॅलो म्हटले जाते. हा हॅलो काही दोऱ्यांनी अडकलेला असून जो स्टेफनीच्या डोक्यावर राहतो.

शस्त्रक्रिया ठरली असती जीवघेणी

दोऱ्याने खेचल्याने तिच्या कण्याचे हाडही सरळ झाले असते, यामुळे स्कोलियोसिसचा प्रभाव कमी झाला असता. स्टेफनी प्रथम शस्त्रक्रिया करवू इच्छित होती, परंतु शस्त्रक्रियेमुळे जीवही जाऊ शकतो हे कळल्यावर तिने पाऊल उचलणे टाळले. आता ती पूर्ण जीवन अशाच स्थितीत जगणार आहे. तिची आई अणि भाऊ तिची देखभाल करतात. स्टेफनीने हळूहळू स्थितीशी जुळवून घेतले असून लोक आपल्याविषयी काय विचार करतात याचा फरक तिला पडत नाही.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia