महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

“मी जिवंत आहे”, नाट्यमय घडामोडींनंतर अखेर जगासमोर आली पूनम पांडे

02:55 PM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बॉलीवूड अभिनेत्री मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झाल्याची माहिती शुक्रवारी ( फेब्रुवारी ) तिच्या टीमकडून देण्यात आली होती. तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यामुळे एकंदरीत पूनमच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं होतं. अखेर या २४ तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याचं समोर आलं आहे. पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाहीअसं तिने या व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं आहे. याशिवाय यामध्ये तिने सर्वांची माफी मागितली आहे.

Advertisement

https://www.instagram.com/p/C24C_LyIy6m/?hl=en

Advertisement

Advertisement
Tags :
#bollywod#poonampandeydeath#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article